शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर तालुक्यात रा.काँ. वरचढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:03 IST

मंगरुळपीर:  तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ ठरली असली तरी, भाजपानेही मुसंडी मारल्याचे  स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचे सरपंच पद राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या, तर १३ ठिकाणी भाजप सर्मथक उमेदवारांनी बाजी मारली. 

ठळक मुद्देभाजपाचीही  मुसंडीसेना, काँग्रेस, भारिप भुईसपाट 

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर:  तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ ठरली असली तरी, भाजपानेही मुसंडी मारल्याचे  स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचे सरपंच पद राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या, तर १३ ठिकाणी भाजप सर्मथक उमेदवारांनी बाजी मारली. तालुक्यात झालेल्या ३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत  दाभडीचे सरपंच पद अविरोध झाली, तर वसंतवाडी आणि रामगड येथील सरपंच पद  रिक्त आहे. त्यामुळे ३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी मतदान झाले. यामध्ये पूर्वीच अविरोध झालेल्या ग्रामपंचायत सरपंचासह २१ ठिकाणी राष्ट्रवादी सर्मथित सरपंच निवडून आल्याचा तर उर्वरीत १३ ठिकाणी भाजपा सर्मथक सरपंच निवडून आल्याचा दावा त्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. शिवसेना, काँग्रेस या पक्षांना या निवडणुक ीत  अपेक्षित मजलसुद्धा गाठता आली नाही. एकूणच ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी  काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांनी चांगलीच मजल मारली आहे. मंगरुळपीर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे नेहमीच जड राहिले आहे. माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचा तालुक्यात विशेष करून ग्रामीण भागात चांगला राजकीय दबदबा आहे. अशात भाजपाचे यश उल्लेखनीय आहे. सरपंच पदासाठी निवडणूक लढविलेल्या भाजपाच्या सर्मथक उमेदवारांनी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश लुंगे, लक्ष्मीकांत महाकाळ, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, तालुकाध्यक्ष चंद्रमणी इंगोले, शाम खोडे, बंडू आव्हाडे यांच्या नेतृत्वात पारवा, धोत्रा, मोझरी, पिंप्री, पिंपळखुटा, बेलखेड, गिंभा, आसेगाव, भडकुंभा, शेलगाव, जांब, सोनखास, ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचा झेंडा रोवला. त्याशिवाय पोघात, घोटा या ग्रामपंचायतींमध्ये इतर पक्षाच्या सर्मथकांशी हातमिळवणी करून विजय मिळविला. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रथमच भाजपाला हे घवघवीत यश मिळविणे शक्य झाले आहे. 

काही ठिकाणी जुन्याच सरपंचाचे वर्चस्व कायमतालुक्यातील शिवणी रोड, पारवा ,वरुड या ठिकाणी सरपंच पद जुन्याच सरपंचाकडे आले आहे. शिवणी व पारवा येथील पत्नीच्या जागी आता पतीराजाकडे सरपंच पदाची सूत्रे आली आहेत. तर वरुडचे सरपंच उमेश आत्माराम गावंडे यांना थेट जनतेनेसुद्धा सरपंच पद पुन्हा सोपविले आहे तर तालुक्यातील बर्‍याच ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी गटाला पुन्हा संधी मिळाली आहे. तर काही ठिकाणी प्रस्थापितांचा विरोध मोडीत काढत जनतेने नव्या चेहर्‍यांनासुद्धा संधी दिली आहे. ३५ पैकी दाभडी वगळता इतर ग्रा.पं. मध्ये मतदान घेण्यात आले. सरपंचांनी अविरोध निवड करुन दाभडीच्या ग्रामस्थांनी सामाजिक सलोख्याचा चांगला पायंडा पाडल्याची चर्चा ऐकावयास मिळाली