शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : एकाच बागेत 5 आंतर पीक घेणारा ‘शिवाजी’

By admin | Updated: January 27, 2017 16:35 IST

ऑनलाईन लोकमत/ नंदकिशोर नारे  वाशिम, दि. 27 -  एका एकराच्या आंब्याच्या बागेत आंतरपिक म्हणून अ‍ॅपल बोर, कांदा, कडाय, रेशीम ...

ऑनलाईन लोकमत/ नंदकिशोर नारे 

वाशिम, दि. 27 -  एका एकराच्या आंब्याच्या बागेत आंतरपिक म्हणून अ‍ॅपल बोर, कांदा, कडाय, रेशीम उद्योग व रोपवाटीका असे पाच पीक घेणारा वाशिम तालुक्यातील टो येथील प्रयोगशिल शेतकरी ‘शिवाजी’ने नवीन प्रयोग यशस्वी केला आहे. एवढेच नाही तर त्याने या 
 
आगळ्या वेगळ्या शेतीप्रयोगातून तब्बल 3,75,000 रुपये (पावणे चार लाख रुपये) उत्पन्न घेतले आहे.  टो येथील शेतकरी शिवाजी  बोरकर यांच्याकडे पाच एकर शेती आहे, पारंपरिक पद्धतीचे पीक परवडत नसल्याने केवळ इयत्ता चौथी शिक्षण झालेल्या शिवाजीने अनुकरणातून गत सात वर्षापूर्वी एका एकर शेतीमध्ये केसर जातीच्या आंब्याची १०० झाडे लावलीत. 
 
दरवर्षी सदर आंब्याची विक्री करुन ७० ते ८० हजार रुपये उत्पन्न त्यांना होते. आंब्याची लागवड करतांना त्यांना २० बाय २० फूट अंतरावर केल्याने मधात चांगलाच स्पेसमध्ये अ‍ॅपल बोर लावली. यापासून त्यांना यावर्षी ६० हजार रुपयांचे उत्पन्न झाले. बोराचे उत्पन्न झाल्यानंतर बोरांची झाडे काढून त्याठिकाणी कांद्यांची लागवड केली. त्यापसून जवळपास ५० हजार रुपयांच्यावर उत्पन्न अपेक्षित असल्याचे शिवाजी यांचे म्हणणे आहे. 
 
याहीवर्षी आंब्याला चांगला मोहोर आल्याने लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.  तसेच बागेच्या आजुबाजूला लावलेल्या तुतीपासून जे रेशीम तयार होणार आहे त्यापासून जवळपास दीड लाख रुपये उत्पन अपेक्षित आहे.  याच आंब्याच्या बागेत विविध झाडांची रोपवाटीकेपासून किमान १० हजार रुपये याप्रमाणे एकूण पावणे चार लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.  
 
कृषिचा कोणताही डिप्लोमा अथवा शिक्षण झालेल्या नसलेल्या शिवाजीने अनुकरणातून कृषी क्षेत्रातील पिकांचे अंतर सुशिक्षितांनाही भुरड घालणारे आहे. अनेक कृषी क्षेत्रातील अधिका-यांनी येथे भेट देवून शिवाजींच्या कार्याचा गौरव केला आहे.
'प्रयोग केला त्याला यश आले'
एकच एक पीक घेवून वर्षभर शेत पडित ठेवल्यापेक्षा त्यामध्ये काही तरी नवीन प्रयोग करण्याचे मनी आले. व असे कोणते पीक आहे जे एकावेळी जास्तीत जास्त घेता येऊ शकते, याचा विचार केला व त्यापद्धतीने हे सर्व पीक घेतले. या पिकामुळे कोणत्याही पिकाचे नुकसान किंवा वाढीस अडचण होत नाही. प्रयोग करण्याचा प्रयत्न केला त्यात यश आले. आता काही शेतकरी येऊन माहिती विचारतात तेव्हा बरे वाटते - शिवाजी बोरकर, शेतकरी, टो.
 

https://www.dailymotion.com/video/x844q1p