शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : वाशिममधील पोलिस चौक्या झाल्या बुजगावणे

By admin | Updated: November 14, 2016 17:45 IST

ऑनलाइन लोकमत वाशिम, दि. १४ -  पोलिस स्टेशनच्या हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस उपस्थित राहावे म्हणून विविध ...

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १४ -  पोलिस स्टेशनच्या हद्दीतील महत्त्वाच्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस उपस्थित राहावे म्हणून विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या पोलिस चौक्या आता केवळ बुजगावणेच झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  
पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे सदर चौक्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी, कायदा व सुव्यवस्थेवरील पोलिसांची पकड सैल झाली असून, शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. कारंजा शहरातील बसस्थानकावरील पोलिस चौकी वगळता इतर चौक्या अपवादानेच उघडल्या जातात. त्याशिवाय कर्तव्य बजावत असलेले अधिकारी, कर्मचारी या चौक्यांकडे ढुंकुणही पाहत नसल्याचे दिसते. आहे. मंगरुळपीर शहरातील सुभाष चौक परिसरात असलेली पोलिस चौकी, तर असून अडचण नसून खोळंबा अशीच आहे. या चौकीच्या कुंपणाचे तीन तेरा वाजल्यामुळे गुरेढोरे रात्री आणि दिवसाही चौकीच्या आवारात मुक्तपणे विसावा घेत घाण करीत असतात. साधारण वर्षभरापूर्वी तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांनी ही चौकी सुरू केली होती; परंतु त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा या चौकीची गरज नसल्याप्रमाणे त्या ठिकाणी कधीच कोणी उपस्थित असल्याचे दिसत नाही.  मंगरुळपीरच्या बसस्थानकावर तर पोलिस चौकीही नाही.  बसस्थानकावर अद्याप पोलिस चौकी उभारण्यात आलेली नाही. शहर पोलिस स्टेशन प्रशासनाकडून येथे दररोज दोन पोलिसांची ड्युटी लावण्यात येत असते; परंतु सदर पोलिसांना बसण्यासाठी येथे चौकीच नसल्यामुळे त्यांना कर्तव्य बजावताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे                          

https://www.dailymotion.com/video/x844hvg