नाना देवळे, ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर (वाशिम), दि. १० - शहरातील व्हिडीओ चौकात नाथ नगरीचा राजा गणेश मंडळाची स्थापना दरवर्षी करण्यात येते, दरवर्षी काही आगळे वेगळे करुन नाथनगरीचा राजा शहराचे भूषण ठरत आहे. यावर्षी या गणेश मंडळासमोर आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य सजावटीसह मंडप तयार करण्यात आला आहे. आठ फूट उंच श्रींची मुर्ती व परिसरात करण्यात आलेली विद्युत रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही सजावट भावीकासाठी आकर्षण ठरत असून दररोज शेकडो भाविक नाथनगरीच्या राजाच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहे.