शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना तालुकाप्रमुखाकडून वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:30 IST

तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, कारंजा तालुक्यातील मांडवा फाटा ते पेडगावदरम्यान रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना महादेव ठाकरे ...

तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, कारंजा तालुक्यातील मांडवा फाटा ते पेडगावदरम्यान रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना महादेव ठाकरे यांनी २ जून रोजी प्रत्यक्ष येऊन काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे काम बंद करा, अन्यथा हात-पाय तोडून तुम्हाला घरी पाठवू, अशी धमकी दिली; मात्र त्यास न जुमानता काम सुरूच ठेवण्यात आले. दरम्यान, ४ जून रोजी रात्रीच्या सुमारास ओग्ली पेवर, टेंडम रोलर, ब्रोझर व इतर वाहनांची महादेव ठाकरे व त्यांच्या सोबत आलेल्या इतरांनी तोडफोड केली व कामावर हजर असलेल्या कामगारांना धमकीदेखील देण्यात आली, असे जवादे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

.................

कोट :

कामाची गुणवत्ता चांगलीच असल्याने काम बंद होणार नाही, असे सांगितल्यानंतर खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांकडून कपंनीच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. गवळी यांचे समर्थक स्वत:च्या फोनवरून गवळी किंवा त्यांच्या पी.ए.शी बोलण्यास सांगतात. या सर्व प्रकाराची तक्रार कारंजा व मंगरूळपीर पोलिसांत दाखल केली आहे.

प्रभाकर जवादे

प्रकल्प व्यवस्थापक, व्ही.पी.शेट्टी कपंनी.

.................

राष्ट्रीय महामार्गाचे काम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्ही.पी. शेट्टी कंपनीला दिले आहे. कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने कामावर येऊन वाहनांची तोडफोड केली. रस्ता दुरूस्तीचे काम पावसाळयापुर्वी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे कोणीही आडकाठी आणू नये. कामाची गुणवत्ता नियमित तपासली जाते. यापुढे असा प्रकार घडल्यास आम्ही स्वत: शासनाकडून तक्रार दाखल करू.

- अरविंद काळे

प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग

................

रिसोड तालुक्यातील कळगव्हाण ते चांडस या रस्त्यावर खड्डे पडले होते. रस्ता दुरूस्तीकरिता या भागातील जनतेने अनेक वेळा आंदोलने केली. आता रस्त्याची दुरुस्ती होत असून ती दर्जेदार असावी, यासाठी आग्रह धरला. त्यामुळे संबंधित ठेकेदारांनी खोटी तक्रार करून या प्रकरणात आम्हाला गोवण्याचा प्रयत्न केला आहे.

महादेव ठाकरे

तालुका प्रमुख, शिवसेना, रिसोड.