शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गायींची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तोडफोड!

By admin | Updated: July 12, 2017 01:33 IST

ग्रामस्थांचा संताप अनावर : वाहन चालकासह तिघांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कजऊळका रेल्वे : वरदरी (बु.) येथून बार्शिटाकळीकडे सहा गायी घेवून जाणाऱ्या वाहनास कवरदरी-मालेगाव व किन्ही येथील गावकऱ्यांनी पकडून जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनच्या स्वाधीन केले. तत्पूर्वी संतापलेल्या ग्रामस्थांनी गायींची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तोडफोड केली. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.वरदरी बु. येथुन कवरदरीमार्गे बार्शिटाकळीकडे जाणाऱ्या बेलोरा पिकअप (क्रमांक एम.एच.३७ जे १४७५) वाहनातून सहा गायी घेवून जात होते. दरम्यान, कवरदरी येथील नागरिकांना संशय आल्यामुळे त्यांनी वाहन चालकास वाहन थांबावयास सांगितले; परंतू वाहन न थांबल्यामुळे काही नागरिकांनी मालेगावला फोन करुन माहिती दिल्याने मालेगाव येथील लोकांनी त्या वाहनाला थांबवले असता त्यामध्ये सहा गायी आढळुन आल्या. यावेळी नागरिकांचा संताप अनावर झाल्याने वाहनाच्या काचा व टायर फोडले व पोलिस स्टेशनला माहिती कळवली. पोलिसांनीही घटनास्थळी येवून त्यांना ताब्यात घेतले. या गायी चोरुन कत्तलखान्याकडे जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती. नागरिकांच्या सर्तकामुळे गायींचे प्राण वाचले. जऊळका पोलिसांनी सहाही गायींना जऊळका रेल्वे येथील गोरक्षणमध्ये ठेवले आहे. या घटनेची फिर्यादी किन्हीराजा पोलिस चौकीचे ज्ञानेश्वर राठोड यांनी दिली असून जऊळका पोलिसांनी याप्रकरणी हरिचंद्र राठोड व सागीर उल्हास खाँ. आणि शे.हारुन शे हमीद अशा तिघांवर कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला. गायींची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तोडफोड केल्यामुळे सदर वाहन टॅक्टरमध्ये टाकुन पोलिस स्टेशनला आणण्यात आले. दरम्यान, सदर गायी चोरीच्या आहेत की कुणाच्या मालकीच्या, याचा पोलिस शोध घेत आहेत.