शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वाहन नोंदणीतून कोट्यवधींची अवैध उलाढाल!

By admin | Updated: April 11, 2016 01:23 IST

शोरूममध्येच आकारली जाते अवास्तव रक्कम : ‘लोकमत स्टिंग’ने केला पर्दाफाश.

संतोष वानखडे / शिखरचंद बागरेचा / वाशिम वाहन नोंदणी (रजिस्ट्रेशन), बंधनकारक केलेली अँक्सेसरीज्ची खरेदी, एक्सटेंडेड वॉरंटी आदींच्या नावाखाली वाशिम जिल्ह्यातील काही शोरूममध्ये ग्राहकांची खुलेआमपणे कशी लूट केली जाते, याचा पर्दाफाश लोकमतने स्टिंग ऑपरेशनमधून केला. या धंद्यात कोट्यवधींची उलाढाल होत असून, ग्राहकवर्ग फसला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.वाशिम शहरासह जिल्हाभरात दुचाकी, चारचाकी वाहने, तीन चाकी ऑटो, मालवाहतूक वाहने, ट्रॅक्टर व अन्य प्रकारच्या वाहनांची विक्री करण्यासाठी जवळपास २0 ते २५ अधिकृत वितरक आहेत. शासकीय नियमांच्या अधीन राहून या वितरकांनी वाहनांची विक्री करणे अपेक्षीत आहे. वाहनांची एक्सशोरूम किंमत, कंपनीकडून मिळणार्‍या सुविधा किंवा सूट, आरटीओंचे अधिकृत नोंदणी शुल्क, टॅक्स, अँक्सेसरीज् आदींबाबत वाशिम शहरासह जिल्ह्यातील काही शोरूममध्ये ग्राहकांची आर्थिक लूट सुरू असल्याची माहिती ह्यलोकमतह्ण प्रतिनिधींना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी शहरातील काही शोरूमंमध्ये स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. अकोला रोड ते पुसद नाक्यापर्यंतच्या काही ट्रॅक्टर शोरूममध्ये कोटेशन, ट्रॅक्टरची एक्सशोरूम किंमत, रजिस्ट्रेशन व ह्यअँक्सेसरीज्ह्ण याबाबत स्टिंग केले असता, धक्कादायक बाबी समोर आल्या. एक्सशोरूम किंमतीव्यतिरिक्त ज्ॉक, टुल किट, स्टेफणी यासह अन्य साहित्य (अँक्सेसरीज) घेणे बंधनकारक असून, यासाठी १८ ते २४ हजार रुपये आकारले जातील तसेच आरटीओ पासिंग व इन्शूरन्सचे १५ ते १७ हजार रुपये द्यावे लागतील, असे प्रस्तुत प्रतिनिधीला सांगण्यात आले. आमच्याकडे शेतीचा सातबारा असल्याने ट्रॅक्टर रजिस्ट्रेशनसाठी किती रुपये लागतील, अशी विचारणा केली असता, साधारणत: ३ ते ४ हजार रुपये लागतात, असे उत्तर मिळाले. येथेही रजिस्ट्रेशनच्या नावाखाली लुट होत असल्याचे दिसून येते.चारचाकी कार, जीप आदी वाहनांबाबत अकोला रोड ते हिंगोली रेल्वे गेटपर्यंतच्या काही शोरूममध्ये विचारणा केली असता, वाहन रजिस्ट्रेशनसाठी ५५0 रुपये, ह्यइन्शूरन्सह्ण काढल्यानंतरही ह्यएक्सटेंडेड वॉरंटीह्णच्या नावाखाली वाहनाच्या किंमतीनुसार ७ ते १६ हजार रुपये आणि १0 ते २0 हजारापर्यंतची अँक्सेसरीज बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. मोटारसायकलच्या काही शोरूममध्ये विचारणा केली असता, ५५0 रुपये वाहन रजिस्ट्रेशन, वाहनाच्या किंमतीनुसार एक हजार ते १७00 रुपयापर्यंत अँक्सेसरीज घेणे बंधनकारक असल्याची माहिती मिळाली. तसा उल्लेखही कोटेशनमध्ये केला जातो. शासकीय नियमानुसार दुचाकी वाहन नोंदणीची सर्व कार्यवाही २१0 रुपयांमध्ये होत असताना, ५५0 रुपये कोणत्या आधारावर आकारले जातात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकही अधिकृत एजंट नसल्याने अतिरिक्त आकारण्यात येणार्‍या ३४0 रुपयांचा गल्ला वर्षाकाठी लाखो रुपयांची कमाई करून देत आहे.