शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

भाजीपाला क्षेत्रफळ दुप्पट !

By admin | Updated: December 4, 2015 02:52 IST

वाशिम जिल्हय़ातील भाजीपाला क्षेत्रफळात गत चार वर्षात दुपटीने वाढ ; मात्र यावर्षी मात्र अल्प पावसाने भाजीपाला लागवडीत व्यत्यय.

संतोष वानखडे / वाशिम: पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकरी नानाविध प्रयोग करीत आहेत. या प्रयोगातूनच रब्बी हंगामात जिल्हय़ातील भाजीपाला क्षेत्रफळात गत चार वर्षात दुपटीने वाढ झाली. यावर्षी मात्र अल्प पावसाने भाजीपाला लागवडीत व्यत्यय निर्माण केला. विविध कारणांमुळे शेती करणे परवडेनासे झाल्याचा सूर शेतकरीवर्गातून निघ त आहे. ्रपारंपरिक पिकांबरोबरच फळबाग, भाजीपाला आदी उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नातूनच रब्बी हंगामात जिल्ह्यातील भाजीपाला लागवडीखालील क्षेत्रफळात वाढ होत असल्याचे दिसून येते. सन २0११-१२ मध्ये जिल्ह्यातील १३६४ हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. यामध्ये सर्वाधिक लागवड वाशिम तालुक्यात ३२२ हेक्टर तर त्याखालोखाल मंगरुळपीर तालुक्यात ३0५ आणि सर्वात कमी कारंजा तालु क्यात ११८ हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. सन २0१२-१३ मध्ये भाजी पाल्याखालील लागवड क्षेत्रफळात वाढ होऊन ते २१३0 हेक्टरवर पोहोचले. वाशिम तालुक्यात ५00 व मंगरुळपीर तालुक्यात ४५0 हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. सन २0१४-१५ मध्ये २२२५ हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. यावर्षी वाशिम तालुक्यात भाजीपाला लागवडीचे क्षेत्रफळ घटले आणि मानोरा तालुक्यात अनपेक्षित भाजीपाल्याखालील क्षेत्रफळात वाढ झाली. मानोरा तालुक्यात ४१0 हेक्टरवर तर वाशिम व रिसोड तालुक्यात प्रत्येकी ३५0 हेक्टरवर भाजीपाला लागवड होती. सन २0१५-१६ या वर्षात २५00 हेक्टरवर भाजीपाला लागवडीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला; मात्र यावर्षीचा अल्प पाऊस आणि नादुरूस्त विद्युत रोहित्रामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीकडे फारसे धजावत नसल्याचे सद्यस्थितीत दिसून येते. सध्या १४00 हेक्टरपर्यंत भाजीपाला लागवड झाली आहे. पाणी असूनही वीजपुरवठा सुरळीत नसणे, काही ठिकाणी जलसाठय़ातील घट, विद्युत रोहित्र नादुरूस्त, जादा भारनियमन आदी कारणांमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी यावर्षी अडचणीत सापडले आहेत. परिणामी, यावर्षी भाजीपाला लागवड स्थिर राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात कारंजा तालुक्यात सर्वात कमी तर वाशिम तालुक्यात सर्वात जास्त भाजीपाला लागवड होत असल्याचे आकडेवारी सांगते. कारंजा तालुक्यात ५८0, मालेगाव तालुका ७६८, मंगरुळपीर तालुका ११0५, मानोरा तालुका १0८९, रिसोड तालुका ८६१ आणि वाशिम तालुक्यात सर्वाधिक ११७२ हे क्टरवर गत तीन वर्षात भाजीपाला लागवड झाली.

*यावर्षी संकट

दरवर्षी भाजीपाला लागवडीखालील क्षेत्रफळात वाढ होत असल्याचे दिसून ये ते. यावर्षी विविध कारणांमुळे भाजीपाल्याचे क्षेत्रफळ स्थिर राहण्याचा अंदाज आहे. भाजीपाला उत्पादनातून आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न शे तकरी करीत आहेत. शेतकर्‍यांसाठी भाजीपाल्याची बाजारपेठ उपलब्ध असणे गरजेचे आहे. यामुळे भाजीपाल्याचा चांगला बाजारभाव मिळू शकेल, यात शंका नाही.