शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

बोराळा येथे विविध समस्या, ग्रामस्थ त्रस्त

By admin | Published: June 17, 2014 8:00 PM

विविध समस्यांमुळे ग्रामस्थ मात्र त्रस्त झाले आहेत.

बोराळा: या गावचे घरणामुळे पुनर्वसन झालेले आहे. या गावाचा विकास केल्यास गावाचे नंदवनवन होवू शकते परंतु या गावाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. विविध समस्यांमुळे ग्रामस्थ मात्र त्रस्त झाले आहेत. संबधितांना निवेदने देवूनही काहीच फायदा होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.या गावामध्ये कीत्येक वर्षापासून गावच्या विकासाच्या दृष्टीने एकही काम झालेले नाही . गावामध्ये स्मशान भुमीची व्यवस्था नसल्याने गावात एखादयाचे निधन झाल्यास त्या व्यक्तिच्या शवाला रस्त्याच्या कडेला अंत्यविधीचा कार्यक्रम उरकावा लागतो , परंतु पावसाळयाच्या दिवसात मोठा त्रास सहन करावा लागतो मात्र संबधितांना याचे काही देणे घेणे दिसून येत नाही. गावामध्ये धरण असल्यामुळे पाणी पुरवठयाच्या विहीरीला चांगल्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध आहे परंतु अयोग्य पाणी वाटपामुळे गावातील लोकाना दह ादिवसाला एकवेळा पाणी मिळते. पाण्याच्या टाकीजवळ गावातील काही जणांनी केरकचरा, गुरांचे शेण व इतर अडगळीत साहीत्य टाकले आहे. यामुळे पाण्याच्या टाकीजवळ घाणीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घाणीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात पाणी असून सुद्धा पावसाळयात सुध्दा योग्य नियोजनाअभावी २ किमी वरुन पिण्याचे पाणी आणावे लागते कित्येक वर्षापासून पाईपलाईन फुटलेली असून सुध्दा दुरूस्त करण्यात आली नाही. गावातील खांबावर दोन वर्षापासून पथदिवे नाहीत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळेच्या परिसरामध्ये खुप घान साचल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शाळेतील मध्यान्ह भोजन घेण्यास विद्यार्थ्याच्या पालकांची यामुळे नाराजी दिसून येत आहे. याबाबत अनेकवेळा ग्रामपंचायत, गट विकास अधिकारी व सीओ यांना निवेदनाव्दारे कळविले आहे मात्र कोणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही . तरी याकडे लक्ष देण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समिती व गावकर्‍यातर्फे करण्यात येत आहे.