शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्यात १८ गावांतील मतदान केंद्र संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:51 IST

कांरजा लाड: तालुक्यातील४९ ग्रामपंचायतींची निवडणुक उद्या  ७ ऑक्टोबर रोजी होणार असून, यासाठी मतदान होणार  असलेल्या १५४ मतदान केंद्रांपैकी ३ मतदान केंद्र अ ितसंवेदनशील असल्याचे प्रशासनाकडून ६ ऑक्टोबर रोजी  जाहीर करण्यात आले. 

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूकमहसूल, पोलीस प्रशासनाकडून खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्ककांरजा लाड: तालुक्यातील४९ ग्रामपंचायतींची निवडणुक उद्या  ७ ऑक्टोबर रोजी होणार असून, यासाठी मतदान होणार  असलेल्या १५४ मतदान केंद्रांपैकी ३ मतदान केंद्र अ ितसंवेदनशील असल्याचे प्रशासनाकडून ६ ऑक्टोबर रोजी  जाहीर करण्यात आले. कारंजा तालुक्यात ४९ ग्रामपंचायत मधील ४९ सरपंच पदासाठी  तर २२२ सदस्यांच्या निवडीसाठी ७ ऑक्टोबर रोजी तालुक्या तील १५४ मतदान केंद्रावर मतदान प्रकीया पार पडणार आहे.  मदतान प्रकीया शांततेत पार पडावी यासाठी उपविभागीय महसूल  अधिकारी डॉ शरद जावळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा  तहसिलदार सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्न ाकर नवल, ठाणेदार गजानन गुल्हाने यांच्या मार्गदशनाखाली  १७0 पथकासह १५00 महसूल व पोलीस कर्मचारी तैनात  करण्यात आले आहेत. काही मतदान केंद्र अति संवेदनशिल तर  काही संवेदनशील म्हणून घोषीत केले आहे. या पृष्ठभूमीवर  संबंधित मतदान केंद्रांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात  करण्यात आला आहे. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांत पसरणी,  आखतवाडा, महागाव या तीन मतदान केंद्रांचा समावेश आहे,  तर संवेदनशील मतदान केंद्रांत मनभा, पोहा, बांबर्डा, पारवा  कोहर, काडशिवणी, मोखड पिंप्री, काकडशिवणी, डोंगरगाव,  पारवा कोहर, ब्राम्हणवाडा, दोनद बु., म्हसला, कामठा,  विळेगाव, लोणी अरब या ठिकाणच्या मतदान केंद्रांचा समावेश  आहे.  कारंजा तालुक्यात १५४ मतदान केंद्रावर प्रत्येकी ५  प्रमाणे १५00 महसुल व पोलीस कर्मचारी तैनात करण्यात  आले. ५३ ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्य पदाच्या  निवडणुकीत वडगाव इजारा, तारखेडा, लोहगाव या ग्राम पंचाय ती अविरोध निवडून आल्यात. एक ग्राम पंचायतच्या सरपच  पदाची जागा रिक्त आहे. त्यामुळे ४९ सरपंच पदाच्या जागेसाठी  १८१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत,  ३९७ सदस्यांच्या  जागेसाठी निवडणूक होणार होती. यामधे १६५ सदस्य अविरोध  निवडून आले, तर १0 रिक्त असून २२२ सदस्यांच्या जागेसाठी  निवडणुक होणार आहे. सदस्य पदाच्या निवडणुक करीता ६६६  उमेदवार निवडणुक रिंगणात असून यासाठी ७ ऑक्टोबर रोजी  १५४ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. यापैकी काही मतदान  केंद्र अति संवेदनशील व संवेदनशील म्हणुन निवडणुक  आयोगाने घोषीत केले. मतदान प्रकीया पार पडल्यानंतर ९ ऑ क्टोबर रोजी शेतकरी निवास मंगरूळपीर रोड कारंजा येथे ११  फे-यामध्ये मतमोजनीच्या कार्यक्रमास सुरवात होणार आहे.

४९ सरपंच पदासाठी १८१ अर्जकारंजातील ५४ ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्य पदाच्या  निवडणुकीत वडगाव इजारा, तारखेडा, लोहगाव या ग्राम पंचाय ती अविरोध निवडून आल्यात. एक ग्राम पंचायतच्या सरपच  पदाची जागा रिक्त आहे. आता उर्वरितत ४९ सरपंच पदाच्या  जागांसाठी १८१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सरपंच  पदाची निवड प्रथमच थेट मतदारांकडून होणार असल्याने या  निवडणुकीला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे  राजकीय पक्षाचे नेतेही या निवडणुकीबाबत उत्सूक असल्याचे  दिसत आहे.