शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

६० वर्षांवरील व्यक्तीच्या लसीकरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:27 IST

वाशिम : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ६० वर्षांवरील ८८ हजार ७८६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. ६० वर्षांवरील ...

वाशिम : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ६० वर्षांवरील ८८ हजार ७८६ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. ६० वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाच्या टक्केवारीचा विचार करता वाशिम जिल्हा अमरावती विभागात अग्रेसर ठरत आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणास प्रारंभ झाला. जिल्ह्यात ६० वर्षांवरील व्यक्तींची संख्या सुमारे १ लाख ८९ हजार ५३२ इतकी आहे. यापैकी ८८ हजार ७८६ व्यक्तींचे म्हणजेच ४७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांना जिल्ह्यातील ६० वर्षांवरील व्यक्तींचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.

जिल्ह्यात सध्या १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींना ऑनलाईन बुकिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘कोविन’ ॲपवर रोज रात्री ९ वाजता दुसऱ्या दिवशीच्या लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसऱ्या डोससाठी पात्र व्यक्तींच्या सोयीसाठी सद्यस्थितीत वाशिम येथील सामान्य रुग्णालयामध्ये कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा केवळ दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात सुरु केलेल्या लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला.

०००००

कोट

६० वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाच्या टक्केवारीचा विचार करता वाशिम जिल्हा अमरावती विभागात अग्रेसर ठरत आहे. लस ही पूर्णत सुरक्षित आहे. कोरोनापासून बचाव म्हणून १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.

- डॉ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी

००००

६० वर्षांवरील व्यक्ती : १८९५३२

लसीकरण पूर्ण : ८८७८६