शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी पाणी वापरावर सक्तीने बंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:52 IST

वाशिम: जिल्ह्यात यंदा ७० टक्के पर्जन्यमान झाल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसून जिल्ह्यातील कुठल्याच प्रकल्पाची पाणीपातळी २५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेली नाही. ही गंभीर बाब लक्षात घेता सिंचनासाठी पाणी वापरावर सक्तीने बंदी लादण्यात आली आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर काहीअंशी मात करता यावी, यासाठी सर्वच प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

ठळक मुद्देप्रशासनाचा निर्णयप्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी ठेवले राखून

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदा ७० टक्के पर्जन्यमान झाल्याचे प्रशासकीय आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसून जिल्ह्यातील कुठल्याच प्रकल्पाची पाणीपातळी २५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेली नाही. ही गंभीर बाब लक्षात घेता सिंचनासाठी पाणी वापरावर सक्तीने बंदी लादण्यात आली आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर काहीअंशी मात करता यावी, यासाठी सर्वच प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात जून २०१७ या महिन्यापासून अधूनमधून पाऊस कोसळलाही; परंतू पुरसदृष स्थिती एकदाही उद्भवली नाही. वाहता पाऊस न झाल्यामुळे नदी-नाले-ओढे, सिंचन प्रकल्पांमध्ये फारच अल्प प्रमाणात पाण्याचा शिरकाव झाला. परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून आगामी डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यापासून जिल्हाभरात भीषण पाणीटंचाई जाणवण्याचे संकेत मिळत आहेत. ही बाब लक्षात घेवून आतापासूनच नियोजनाचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १२२ लघू अशा सर्वच सिंचन प्रकल्पांमधील पाणी पिण्याकरिता राखून ठेवण्यात आले आहे.