शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बेसुमार उपसा; जलसाठय़ात घट!

By admin | Updated: March 3, 2017 20:19 IST

मालेगावचा पाणीप्रश्न होणार गंभीर : कुरळा प्रकल्पाचा पाणीसाठा १५ टक्क्यांवर!

मालेगाव(वाशिम): रब्बी हंगामातील पिकांसाठी जलप्रकल्पांमधून पाण्याचा बेसुमार उपसा झाल्याने जलसाठय़ात प्रचंड घट झाली आहे. मालेगावला पाणीपुरवठा करणार्‍या कुरळा प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, मार्चच्या अखेरपासूनच शहराचा पाणीप्रश्न गंभीर होण्याचे संकेत मिळत आहेत. तालुक्यातील तलावांमधील जलसाठय़ातील अवैध पाणी उपशामुळे कमालीची घट झाली आहे. त्यामुळे मालेगाव शहरासह तालुक्यात पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यातील देवठाणा, गांगलवाडी, रेगाव, डोंगरकिन्ही, तरोडी आदी गावांमध्ये आतापासून पाणीटंचाई पेटल्यागत स्थिती उद्भवली आहे. मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कुरळा लघुपाटबंधारे प्रकल्पावरून सुरू असलेल्या अवैध पाणी उपशामुळे या तलावातील जलसाठा कमी झाला असून, तो सध्या १५ टक्के एवढा आहे. या तलावात जास्त जलसाठा उपलब्ध असतानाच पाणी उपशावर बंदी आणावयास हवी. मात्र, बेसुमार पाणी उपसा सुरू असताना वीज वितरण कंपनी व पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. बोरगाव लघू पाटबंधारे प्रकल्पामध्ये सध्या मृत जलसाठय़ापेक्षाही कमी जलसाठा शिल्लक राहिला आहे. ब्राह्मणवाडा लघुपाटबंधारे प्रकल्पामध्येही मृत जलसाठा आहे. सुदी लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये सध्या ४४.८९ टक्के जलसाठा असून, सुकांडा लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये, तर केवळ १.८५ टक्के जलसाठा आहे. सोनखास लघू पाटबंधारे प्रकल्पामध्ये सध्या ६६ टक्के जलसाठा आहे. कोल्ही लघुपाटबंधारे प्रकल्पामध्ये ८.९१ टक्के जलसाठा आहे. तालुक्यातील बहुतांश तलावात कमी जलसाठा असल्याने अल्पावधीतच पाणीप्रश्न गंभीर होणार असून, १0 पेक्षा अधिक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.