लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव : येथुून जवळच असलेल्या बेंबळा या गावी एका २२ वर्षीय तरुणाने ६ वर्षाच्या बालकाशी अनैसर्गिक कृत्य केल्याने आरोपीविरूद्ध ५ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.बेंबळा येथील ६ वर्षीय चिमुकला हा आपल्या आजीच्या घरासमोर रविवारी सायंकाळी ६ वाजता दरम्यान खेळत असताना तेथीलच युवक पवन शांताराम जवंजाळ याने बालकास उचलून जवळच्या शेतात नेले आणि त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. स्थानिक काही जणांनी हा प्रकार बघितल्यानंतर या प्रकाराची माहिती पीडित बालकाच्या आईला दिली. बालकाची आई व गावातील काही युवक घटनास्थळाकडे येत असल्याचे पाहून आरोपी पवन याने घटनास्थळावरुन पळ काढला. मनोज काळेकर यांच्या फिर्यादीवरुन भादंवि कलम ३७७ , आरडब्ल्यू. ३, ४ बाललैंगिक संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुुढील तपास ठाणेदार राहुल आठवले, पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे, जमादार गजानन कदम, जमादार राजगुरे, टाले करीत आहेत.
बालकाशी अनैसर्गिक कृत्य
By admin | Updated: June 6, 2017 01:12 IST