शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीचा सामाजिक संस्थेच्यावतिने आगळा-वेगळा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 19:57 IST

वाशिम : चालुवर्षी वरुणराजाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्हावासियांना प्राणी प्रश्न भेडसावणार असुन पाण्याचा प्रश्न सर्वासमोर उभा राहणार असल्यामुळे   भविष्यातील  पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता  त्याचे सुयोग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यातील  राजरत्न संस्थेमार्फत  जिल्हाभरात पाणी बचतीचा संदेश देत पत्रके वाटुन  पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी संस्थेचे प्रतिनिधी लोकआग्रह करीत आहेत.

ठळक मुद्देराजरत्न संस्थेचा उपक्रम घरोघरी वाटल्या जाताहेत पत्रके!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : चालुवर्षी वरुणराजाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्हावासियांना प्राणी प्रश्न भेडसावणार असुन पाण्याचा प्रश्न सर्वासमोर उभा राहणार असल्यामुळे   भविष्यातील  पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता  त्याचे सुयोग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. याकरिता जिल्ह्यातील  राजरत्न संस्थेमार्फत  जिल्हाभरात पाणी बचतीचा संदेश देत पत्रके वाटुन  पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी संस्थेचे प्रतिनिधी लोकआग्रह करीत आहेत.दसरा या सणानिमित्त गाड्या धुण्याकरिता मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केल्या जाते. पाण्याचे कमी असलेले प्रमाण लक्षात घेता   संस्थेच्यावतीने गाड्या धुण्याऐवजी त्या पुसून घ्याव्यात, कुठल्याही ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत यंत्रणेस संचित करावे, नेहमी पाणी काटकसरीने वापरावे, लागेल तेवढेच पाणी घ्यावेत, पाण्यासाठी भांडणतंटे होवु देवु नयेत, धुण्या भांड्याचे पाणी झाडांना टाकावे,  भर पावसाळ्यात जिल्हाभरात तीव्र पाणी टंचाई सदृश चित्र उभे असुन वेळीच सजग होवुन पाण्याची बचत केल्यास पाणी टंचाईवर थोड्यातरी प्रमाणात काय होईना मात करणे शक्य होईल. असा संदेश पत्रकाच्या माध्यमातून संस्थेचे प्रतिनिधी शहर तसेच ग्रामीण भागात जावुन देत आहेत. पाणी हे नैसर्गीक देण आहे,  पाणी हेच जीवन आहे. त्याला मोठ्या प्रमाणात कृत्रीम पध्दतीने बनविता येत नसल्यामुळे  पाण्याचे महत्व संस्थेचे प्रतिनिधी पटवुन देत आहेत. जिल्ह्यातील सर्व सूज्ञ नागरिकांनी या बाबीचा थोडातरी विचार करुन पाणी बचत करावी असे आवाहन राजरत्न संस्थेचे विनोद पट्टेबहादूर, भगवान ढोले, अरविंद उचित, सत्येंद्र भगत,  अविनाश नाईक, प्रशांत राठोड, विकास पट्टेबहादूर, हंसीनी उचित आदिचे वतीने करण्यात येत आहे. भविष्यातील पाणी टंचाईवर थोड्या प्रमाणात काय होईना मात करणे शक्य होईल. प्रशासनाला सहकार्य करण्याकरिता पाणी बचत करणे काळाची गरज असून या संस्थेने राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे उन्हाळयापूर्वीच भीषण पाणी टंचाईची शक्यता नाकारता येत नाही. यावर उपाय म्हणून संस्थेची सभा घेवून याबाबत जनजागृती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आता घरोघरी जावून पाणी बचतीबाबत जनजागृती करतांना नागरिकांकडून मिळत असलेले सहकार्य व उपक्रमाची स्तुती होत आहे.- भगवान ढोले, सदस्य, राजरत्न संस्था