शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममधील शेतक-यांचा कीड नियंत्रणासंदर्भात अनोखा प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 15:34 IST

अलिकडच्या काळात किडीवर नियंत्रण ठेऊन पीक वाढीसाठी रासायनिक औषधांचा वापर सर्रास करण्यात येत असताना वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताडच्या शेतक-यांनी फवारणीसाठी वनस्पतीच्या पानांचा वापर करून नैसर्गिक किटकनाशक तयार केले आहे.

वाशिम, दि. 14 - अलिकडच्या काळात किडीवर नियंत्रण ठेऊन पीक वाढीसाठी रासायनिक औषधांचा वापर सर्रास करण्यात येत असताना वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताडच्या शेतक-यांनी फवारणीसाठी वनस्पतीच्या पानांचा वापर करून नैसर्गिक किटकनाशक तयार केले आहे. या नैसर्गिक औषधामुळे पिकांवरील किडींचे नियंत्रण होते आहेच शिवाय पिकांची जोमाने वाढ होत असल्याने भरघोस उत्पन्नही मिळत असल्याचा दावा शेतक-यांनी केला आहे. 

पार्डी ताड येथील शेतकरी मुरलीधर माचलकर आणि रामा गावंडे हे प्रगतशील शेतकरी आपल्या शेतीत विविध प्रयोग करून विक्रमी उत्पन्न घेतात. शेतीच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत नवे तंत्र विकसीत करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच महागडी आणि आरोग्यासह पिकांसाठीही घातक असलेली रासायनिक औषधांचा वापर टाळून नैसर्गिक पद्धतीने उत्पादन वाढ आणि कीड नियंत्रणासाठी त्यांनी अफलातून प्रयोग केला आहे. या शेतक-यांनी यासाठी विविध प्रकारच्या २१ वनस्पतींची पाने तोडून त्याचा अर्क तयार करत नैसर्गिक औषध तयार केले आहे. 

त्यांनी कडूनिंब, रुई, निर्गुंडी, तरोटा, धोत्रा, तुळस, पपई, जांब, कारले, जास्वंद, डाळींब, पिंपळी, बाभूळ, अश्वगंध, शतावरी, शंखपुष्पी, गुळवेल, गाजरगवत, कोरफड, मिरची आणि जांभूळ आदी वनस्पतींची पाने वापरली आहेत. ही पाने पाण्यात काही काळ पाण्यात भिजवून ती खलबत्त्यात वाटून घेत वस्त्रगाळ लगदा तयार केल्यानंतर तो कापडातून पिळून काढला जातो आणि निघालेल्या अर्कात गोमूत्र आणि गावरान गायीचे शेण मिसळून पाण्याच्या टाकीत मिश्रण तयार केले जाते. 

हा अर्क किटनाशक व टॉनिक म्हणून पिकांवर फवारला जातो. त्यांचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरत आहे. या नैसर्गिक औषधामुळे शेतक-यांच्या पिकांची वाढ जोमाने होत आहेच शिवाय फुलधारणाही अधिक प्रमाणात होऊन किडीवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवणे शक्य झाल्याचे दिसत आहे. हा अर्क तयार करण्यासाठी खर्च म्हणून दोन तीन महिलांची मजुरी त्यांना द्यावी लागली. अतिशय कमी खर्चाचा आणि प्रभावी असा हा अर्क तयार करण्यावर आता इतरही शेतकरी भर देत आहेत.