शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अनपेक्षित निकाल..

By admin | Updated: August 28, 2014 02:25 IST

वाशिम जिल्हा नियोजन व विकास समिती निवडणूक

वाशिम : विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय क्षेत्र ढवळून काढणार्‍या जिल्हा नियोजन व विकास समिती निवडणुकीच्या २७ ऑगस्टच्या धक्कादायक निकालातून राजकीय समीकरणं बदलत चालल्याचे संकेत मिळत आहेत. सर्वसाधारण प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातून अनपेक्षित निकाल समोर आले आहेत. हर्षदा दिलीपराव देशमुख व रजनी महादेव ताटके यांना पराभवाला सामोरे जावे लागले.जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निवडून द्यावयाच्या २१ सदस्यांपैकी नागरी क्षेत्रातील एका सदस्यासह १0 जागांवरचे सदस्य या आधीच अविरोध निश्‍चित झाले होते. उर्वरित तीन प्रवर्गातील ११ जागांसाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्याने २६ ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्यात आली. नागरी क्षेत्रामधून सर्वसाधारण प्रवर्गातील १ व ग्रामीण क्षेत्रातून २0 सदस्य मिळून २१ सदस्य निवडून देणे अपेक्षीत होते. या २0 सदस्यांमध्ये अनुसूचित जातीमधील २, अनुसूचित जाती स्त्री २, अनुसूचित जमाती १, अनुसूचित जमाती स्त्री १, नागरिकांचा मागास प्रवर्गातून ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ३, सर्वसाधारण ५, सर्वसाधारण स्त्री ३ अशा सदस्यांचा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गातून निवडून द्यावयाच्या ३, सर्वसाधारण ५, सर्वसाधारण स्त्री ३ अशा एकूण ११ जागांसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त अर्ज दाखल असल्याने या जागांसाठी २६ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आले. २७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रभारी जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. नागरिकांच्या मागास प्रवर्गातून नथ्थू कापसे, राजेश जाधव, देवेंद्र ताथोड, सर्वसाधारण प्रवर्गातून स्वप्नील सरनाईक, गजानन अमदाबादकर, विकास गवळी, चंद्रकांत ठाकरे व विश्‍वनाथ सानप तर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून गौरी पवार, अन्नपूर्णा मस्के, शबानाबी अ. इमदाद हे उमेदवार निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. अनपेक्षीत निकालाने राजकीय क्षेत्रातील समीकरण बदलाचे संकेत दिले आहेत.