शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मनुष्यबळाअभावी ‘निराधार’ योजनेचे काम संथ!

By admin | Updated: June 17, 2017 00:27 IST

जिल्ह्यातील वास्तव: नायब तहसीलदारांची चार पदे रिक्त

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या संजय गांधी निराधार योजना विभागाचे काम सांभाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा अभाव असल्याने या योजनेची प्रकरणे अनेक महिने प्रलंबित राहत असून, निराधारांची त्यामुळे मोठी परवड होत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. राज्यातील काँग्रेसप्रणीत सरकारने निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, दिव्यांग, शारीरिक व मानसिक आजारग्रस्त व्यक्तींना व निराधार विधवांना सामाजिक आधार मिळावा, सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून अर्थसाहाय्य देण्याच्या हेतूने संजय गांधी निराधार योजना सन १९८० पासून सुरू केली. त्यानंतर भूमिहीन शेतमजूर महिला, निराधार विधवा यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सन १९९१ पासून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळात योजना तर ६५ वर्षांवरील आर्थिकदृष्ट्या निराधार व्यक्तींसाठी केंद्र सरकारने २००४ मध्ये श्रावणबाळ सेवा योजना अमलात आणली होती. या योजनांचे कामकाज पाहण्यासाठी जिल्ह्यात तालुका स्तरावर अधिकारी, कर्मचारी मिळून ३६ पदांच्या आस्थापनेला मंजुरी मिळाली आणि ती सर्व पदे भरण्यात येऊन संजय गांधी निराधार योजनांचे कामकाजही योग्यरीत्या पार पाडले जात होते; परंतु २०१० पासून या योजनेचे काम सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदे रिक्त झाली असून, सद्यस्थितीत चार नायब तहसीलदार, तीन अव्वल कारकून आणि तीन कनिष्ठ लिपिकांसाठी एकूण १० पदे रिक्त झाली आहेत. यामध्ये मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर आणि कारंजा या चार तहसील कार्यालयांतील संजय गांधी निराधार योजनेच्या विभागातील नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. निराधार योजनेतील लाभार्थींच्या प्रकरणांची चौकशी करणे, त्यांच्या अनुदानाच्या बिलांवर स्वाक्षरी करणे व ती कोषागार कार्यालयाकडे पाठविणे, संजय गांधी निराधार योजनेच्या समितीची सभा बोलाविणे, त्या सभेचे नियोजन करणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या विभागाच्या नायब तहसीलदारांकडून पार पाडण्यात येत होत्या. त्याशिवाय विभागातील कारकून आणि लिपिकांना निराधारांचे अर्ज स्वीकारणे, निराधारांच्या संख्येनुसार त्यांच्या अनुदानाची देयके तयार करणे, त्या देयकांना नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीनिशी कोषागार कार्यालयाकडे पाठविणे आदी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात; परंतु चार तालुक्यांतील नायब तहसीलदारांसह कारकुनांची पदे रिक्त असल्याने निराधारांचे प्रस्ताव स्वीकारणे, त्यांच्या अनुदानाची देयके तयार करणे आदी कामांना मोठा विलंब लागत असून, कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने निराधारांची विविध प्रकरणे महिनो, महिने प्रलंबित राहत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध अर्थसहाय्यित योजनांचे ९० हजार लाभार्थी असून, त्यांची प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने या योजना विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज निर्माण झाली आहे.संजय गांधी निराधार योजना विभागातील जिल्ह्यात रिक्त असलेल्या पदासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. ही पदे भरल्यास इतर कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल; परंतु शासनाच्या निर्णयानंतरच या पदांच्या भरतीबाबत काही कार्यवाही होणार आहे.-शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम.