शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर शेतमालाची अनधिकृत खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:06 IST

वाशिम : कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि परवानाधारक खासगी बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी शेतमाल खरेदीची मुभा नसतानाही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत या नियमाचे उल्लंघन करून रस्त्यावर शेतमालाची खरेदी केली जात आहे. ‘लोकमत’ने १0 नोव्हेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब उघड झाली.

ठळक मुद्देशेतकर्‍यांकडून अल्प भावात खरेदीस्टिंग ऑपरेशन

शिखरचंद बागरेचा । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि परवानाधारक खासगी बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी शेतमाल खरेदीची मुभा नसतानाही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत या नियमाचे उल्लंघन करून रस्त्यावर शेतमालाची खरेदी केली जात आहे. ‘लोकमत’ने १0 नोव्हेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब उघड झाली असून, या प्रकारातून शासनाच्या कराची बुडवणूक होत आहेच शिवाय अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांकडून बेभाव शेतमाल खरेदी करून त्यांचीही लूट करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतकर्‍यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी पणन संचालनालयाच्या अखत्यारित बाजार समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. एखाद्या तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असेल, तर त्या तालुक्यात एक किंवा त्यापेक्षा अधिक उपबाजारांचीही स्थापना करण्यात आली आहे. याच बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांच्या शेतमालाची लिलावाद्वारे खरेदी करण्यासाठी व्यापारी, अडत्यांना अधिकृत परवानेही देण्यात येतात. त्याशिवाय काही व्यापारी मिळून खासगी बाजार समित्यांचीही स्थापना करतात आणि त्याला शासनाची परवानगीही असते. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सन २00६ मध्ये सुधारणा करुन त्यामध्ये खासगी बाजार, थेट पणन, शेतकरी ग्राहक बाजार व कंत्राटी शेती, इ. पर्याय उपलब्ध करुन शेतकर्‍याला आपला कृषी माल विकण्यासाठीचे विविध पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. या अंतर्गत राज्यामध्ये खासगी बाजार व थेट पणन यांचे मोठय़ा प्रमाणात परवाने देण्यात आले आहेत. अशा अधिकृत स्थळांवर लिलाव पद्धतीने शेतकर्‍यांचा शेतमाल खरेदी करण्यात येतो. शेतकर्‍यांच्या शेतमालास योग्य भाव मिळावेत, यासाठी ही संकल्पना अस्तित्वात आली असून, या बाजार समित्यांमध्ये व्यापार्‍यांकडून खरेदी करण्यात येणार्‍या शेतमालावर बाजार समित्यांकडून शेस अर्थात कर वसुलीही केली जाते. या कर वसुलीतील पाच टक्के रक्कम शासनाला मिळते. अर्थात ही व्यवस्था शेतकर्‍यांच्या फायद्यासह शासनाच्या महसुलात भर टाकणारी आहे; परंतु काही ठिकाणी या नियमांचे उल्लंघन करून अनधिकृतपणे शेतमाल खरेदीचा प्रकार करण्यात येत आहे. अडीअडचणीच्यावेळी शेतमालाची रक्कम तत्काळ मिळावी म्हणून शेतकरी अशा ठिकाणचा आधार घेतात. त्याचा फायदा घेऊन शेतकर्‍यांचा माल कवडीमोल भावाने खरेदी करण्याचा प्रकार जिल्ह्यात सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोकमतच्यावतीने शुक्रवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी स्टिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये प्रत्येक तालुक्यात वर्दळीच्या रस्त्यावरच छोटीमोठी दुकाने थाटून अनधिकृतपणे शेतमालाची बेभाव खरेदी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. या प्रकारामुळे शेतकर्‍यांची लूट होत आहेच शिवाय बाजार समित्यांच्या उत्पन्नावरही परिणाम होत असताना बाजार समित्यांकडून त्यावर कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.

 वाशिम शहरांतर्गत नियमबाह्य खरेदी करणार्‍यांवर वेळोवेळी दंडाची कारवाई करण्यात येते. बाजार समितीच्या बाहेर खरेदी करण्याची कुठलीही परवानगी नाही. त्यामुळे अशा खरेदीदारांची पाहणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. - बबन इंगळे सचिव बाजार समिती वाशिम शेतमाल खरेदी नियम 

कारंजा तालुक्यात रस्त्यावर दुकान थाटून शेतकर्‍यांचा शेतमाल खरेदी करण्यावर निर्बंध घालण्यात आला आहे. यानंतरही कोणी नियमांचे उल्लंघन करीत असतील, तर त्याची पाहणी करून त्यांच्याकडून नियमानुसार दंड वसूल करण्याची कारवाई करण्यात येईल. -नीलेश भाकरे सचिव बाजार समिती कारंजा - 

टॅग्स :agricultureशेती