शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘अनधिकृत बांधकाम हटाव’ची कसरत!

By admin | Updated: June 29, 2015 01:40 IST

जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर वाशिम नगरपरिषद लागली कामाला; रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा ‘जैसे थे’.

वाशिम : वाशिम शहराला अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी देताच, नगरपरिषद प्रशासन कामाला लागले आहे. गत काही काळातील अनुभव पाहता, अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा होऊ न देण्याची कसरत नगर परिषदेला करावी लागणार आहे.शहराला अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा गाजावाजा करीत वाशिम, रिसोड व कारंजा शहरात संबंधित नगरपरिषदेने यापूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली; मात्र १५ दिवसांचा कालावधी लोटत नाही तोच 'जैसे थे' परिस्थिती झाली. आता आयएएस दर्जाचे जिल्हाधिकारी लाभले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे वाशिम शहरातील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हटविण्याचे आदेश नगरपरिषदेला दिले आहेत. शहरात अनधिकृत बांधकामे किती आहेत, याचा आढावा घेतल्यानंतर नगरपरिषदेने पोलीस विभागाकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. दरम्यान, यापूर्वी जिल्ह्यातील वाशिम, रिसोड व कारंजा नगरपरिषदेने व्यापक प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली; मात्र, पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याचे नियोजन केले नव्हते. परिणामी, अल्पावधीतच त्याच त्या रस्त्यालगत पुन्हा अतिक्रमण झाले. व्यापार्‍यांनी दुकानासमोर पुन्हा अतिक्रमण केले. दोन वर्षांपूर्वी मालेगाव ग्रामपंचायतनेदेखील व्यापक प्रमाणात अतिक्रमण हटविले. वाशिम, रिसोड, कारंजा नगरपरिषद व मालेगाव ग्रामपंचायत असा एकंदर लाखो रुपयांचा खर्च अतिक्रमण हटाव मोहिमेवर झाला आहे; मात्र भविष्यकालीन ठोस नियोजन नसल्याने अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमा अल्पावधीतच सपशेल अपयशी ठरल्या. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा त्या जागेवर अतिक्रमण होणार नाही याचे नियोजन नसणे, लघुव्यावसायिकांना पर्यायी जागा देणे आदी बाबी स्पष्ट नसल्याने रस्त्यालगत पुन्हा 'दुकानदारी' सुरू झाली आहे. वाशिम शहरात पाटणी चौक, शिवाजी चौक परिसरात अनेक व्यावसायिकांनी दुकानापुढील जागेवर ताबा केला आहे. परिणामी, वाहतूककोंडीत भर पडत आहे. आता दस्तुरखुद्द जिल्हाधिकार्‍यांनीच अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाचा मुद्दा गांभीर्याने घेतल्याने नगरपरिषदांना हे आव्हान पेलावे लागणार आहे. सदर आव्हान नगरपरिषद कशी यशस्वी करते, यावर या मोहिमेचे यशापयश अवलंबून राहणार आहे.