लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : उच्च माध्यमिक शाळांचा ‘कायम’ हा शब्द वगळून त्यांना प्रचलित नियमानुसार आर्थिक अनुदान देण्यात यावे, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांनी १८ जुलै रोजी एकदिवसीय बंद पुकारला आहे. अनेक शाळांमध्ये गेल्या १६ वर्षांपासून अनेक शिक्षक बिनपगारी कार्य करीत आहेत. त्यांचा शासन स्तरावर कुठलाच विचार होत नाही. यासह विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. त्याच्या पूर्ततेसाठी वाशिम जिल्हा उच्च माध्यमिक कृती समितीच्यावतीने एकदिवसीय बंद पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदेखील केले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
विनाअनुदानित शाळा आज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:01 IST