शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतर दाखल झाला दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा!

By admin | Updated: May 14, 2017 02:15 IST

चोरद येथील घटना; आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी.

जउळका रेल्वे : गतवर्षीच्या जून महिन्यात नागपूर-औंरगाबाद महामार्गावरील गिव्हा फाट्यावर दुचाकीस्वार युवकास अज्ञात वाहनाने उडवून दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला; मात्र हा अपघात नसून घातपात असल्याची तक्रार मृताच्या आईने केली होती. त्यावरून पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही बाब निष्पन्न झाल्याने १२ मे रोजी चोरद येथील दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून २0१६ रोजी अज्ञात वाहनाची धडक लागून दीपक खंडारे (रा.चोरद) या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूद्ध जऊळका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता; परंतु मृताच्या आईने हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार, पोलिसांनी चौकशी करून १२ मे रोजी चोरद येथीलच संतोष गुठे (वय ३२ वर्षे) व संतोष आंधळे (वय २२ वर्षे) या दोघांना अटक करून त्यांच्याविरूद्ध कलम ३0२, २0१ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. घटनेतील पुरावे नष्ट करण्याचा ठपकाही आरोपींवर ठेवण्यात आला आहे. आरोपींना १३ मे रोजी वाशिम येथील न्यायालयासमक्ष हजर केले असता, त्यांना न्यायालयाने १५ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.