लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम ते केकतउमरा मार्गावर अज्ञात तीन इसमांनी मोटारसायकल अडवून दोघांकडून १४ हजारांचा ऐवज जबरीने चोरुन नेला. ही घटना २३ मे रोजी रात्री ८ वाजता केकतउमरा मार्गावर घडली.गणेश विश्वनाथ गोटे व गणेश ज्ञानदेव गोटे हे दोघे आपल्या गावी तोंडगाव येथे केकतउमरा मार्गे दुचाकीने जात होेते. दरम्यान, वामन जाधव यांचे शेताजवळ अज्ञात तीन लोकांनी दुचाकी अडवून मारहाण केली व खिशातील दोन मोबाइल व रोख २५०० रुपये, असा एकूण १४ हजारांचा ऐवज जबरीने हिसकावून नेला. या प्रकरणी वाशिम पोलिसांनी अज्ञात तिघांविरुद्ध भादंवि कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
दुचाकी अडवून दोघांना लुटले!
By admin | Updated: May 25, 2017 01:47 IST