जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. मात्र, मृत्युसत्र कायम असल्याने नागरिकांमध्ये थोडी धाकधूक कायम आहे. आणखी दोनजणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची नोंद रविवारी घेण्यात आली. दुसरीकडे नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते. रविवारी नव्याने १०८ रुग्ण आढळून आले, तर १२४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सर्वाधिक रुग्ण कारंजा तालुक्यात २४, तर सर्वांत कमी रुग्ण रिसोड तालुक्यात आठ आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ११ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने केले.
००००००००००००
२४३७ सक्रिय रुग्ण
रविवारच्या अहवालानुसार नव्याने १०८ रुग्ण आढळून आले, तर १२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण २४३७ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
वाशिम- १९
मालेगाव- १२
रिसोड- ०८
मंगरूळपीर- २१
कारंजा- २४
मानोरा- १३