शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
2
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
3
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
4
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
5
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
6
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
7
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
8
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
10
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
11
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
12
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
13
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
14
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
16
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
17
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
18
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
19
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
20
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा

वेगवेगळ्या दोन अपघातात दोन ठार

By admin | Updated: August 31, 2016 02:15 IST

रिसोड तालुक्यात दोन अपघात.

रिसोड(जि.वाशिम), दि. ३0 : वेगवेगळ्या दोन अपघातात दोन जण ठार तर सहा जण जखमी झाल्याच्या दोन घटना तालुक्यातील भर जहागीर व हराळ-वरखेडा मार्गादरम्यान घडल्या.देवदर्शनासाठी गेलेल्या भक्तांचा परतीच्या प्रवासादरम्यान मोटारसायकलस्वाराने कट मारल्याने ऑटोमधील एक प्रवासी ठार व तीन जण जखमी झाल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता भर जहागीर येथे घडली आहे. गुरुसिद्ध मिटकरी यांनी फिर्याद नोंदविली की, श्रावण सोमवारनिमित्त देवदर्शनासाठी लोणार सरोवर येथे जावून परतीकरिता निघालो असता, भरजहागीर येथील पुलाजवळ आटो क्रमांक एम.एच. ३९/३९८४ ला समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या मोटारसायकलने कट मारला. त्यामुळे अाँटो पलटी होऊन प्रमिला मिटकरी, लक्ष्मी चिभडे, शारदा धोत्रे, कस्तुरा घुगसे हे जखमी झाले. यामधील प्रमिला मिटकरी यांचा उपचारादरम्यान खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. आरोपीविरुद्ध कलम २७९, ३0८, ३३७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. हराळ : भररस्त्यावर मोटारसायकलला समोरुन आलेल्या मोटारसायकलने धडक दिल्याने एक जण ठार व तीन जण जखमी झाल्याची घटना ३0 ऑगस्ट रोजी सकाळी १0.३0 वाजता हराळ ते वरखेडा मार्गावर घडली आहे. राजू सावके यांनी फिर्याद नोंदविली की, फिर्यादीचे वडील नामे नामदेव सावके व वहिनी दीपाली सावके हे रा. कवठा ता. सेनगाव हे मोटारसायकलने ताकतोडा हराळमार्गे रिसोडला जात असताना हराळ ते वरखेडा दरम्यान गजानन सरकटे यांच्या शेताजवळ समोरुन येणार्‍या मोटारसायकलने धडक दिली. यामध्ये नामदेव सावके यांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही मोटारसायकलवरील तिघे जण जखमी झाले. जखमींना सरकारी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले.