रिसोड (जि. वाशिम ) : येथील दोन गटात शाब्दीक वाद झाल्याची घटना बुधवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली असून, याचे पडसाद म्हणून गुरुवारी शहरातील भाजीबाजार दिवसभर बंद होता. दरम्यान, शहरात शांतता असून, पोलीस प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. शहरातील दोन गटात एका किरकोळ कारणावरून बुधवारी रात्रीच्या सुमारास शाब्दीक वाद झाला. हा वाद वाढत जाऊन अज्ञात व्यक्तीने भाजीबाजारातील एका दुकानाला आग लावण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. सदर प्रकाराबाबत एका गटाने रिसोड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरून पोलिसांनी ११ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत.
रिसोड येथे दोन गटात वाद; भाजीबाजार बंद
By admin | Updated: June 10, 2016 02:12 IST