मंगरुळपीर (वाशिम): शहरातील टेकडीपुरा परिसरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारी प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील एकूण सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल के ला आहे. पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत एका गटातील फिर्यादी फैजलखान याने म्हटले आहे, की आरोपी फैजान सौदागर याने १६ ऑक्टोबरच्या रात्री त्याची दुचाकी अगदी आपल्या जवळून नेत आपल्याला घाबरविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विचारणा केल्यानंतर आरोपीने आपल्या डोक्यात फायटर मारून जखमी केले, तर त्याचे साथीदार आरोपी क्र मांक २ व ३ ने शिवीगाळ करून मारहाण केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दुसर्या गटातील आरोपींविरुद्ध कलम ३२४, ५0४, ५0६, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला, तर पहिल्या गटातील फिर्यादी मो. फैजान याने म्हटले आहे, की फै जल फसी उल्लाखान, फरकत खान, फजलुखान, यांनी आपण दुकानासमोर उभे असताना आपल्या डोक्यावर फायटरने मारहाण करून जखमी केले, तसेच शिवीगाळही केली. या तक्रारीवरून पोलिसांनी पहिल्या गटातील आरोपींविरुद्ध ३२४, ५0४, ५0६, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.
मंगरुळपीर येथे दोन गटात हाणामारी
By admin | Updated: October 19, 2014 00:27 IST