शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दोन उमेदवार अविरोध; आता एका जागेसाठी निवडणूक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 20:42 IST

वाशिम : जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) रिक्त असलेल्या तीन जागांपैकी दोन जागा अविरोध झाल्या असून आता १४ सप्टेंबर रोजी एका जागेसाठी निवडणूक होत आहे.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समिती १०५ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) रिक्त असलेल्या तीन जागांपैकी दोन जागा अविरोध झाल्या असून आता १४ सप्टेंबर रोजी एका जागेसाठी निवडणूक होत आहे.लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या मतदार संघातून ही निवडणूक होत असून एकंदरित १०५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणूकीसाठी २८ आॅगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होती. त्यानुसार, शेवटच्या दिवशी १० उमेदवारी अर्ज दाखल झाले. २९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी होवून त्याचदिवशी दहाही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. ५ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. अनु. जाती स्त्री प्रवर्गाचा अपवाद वगळता उर्वरीत दोन्ही प्रवर्गातील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने दोन उमेदवारांची अविरोध निवड झाली. अनु.जाती स्त्री प्रवर्गातून भाजपाच्या करूणा कल्ले (वाशिम) व राकाँच्या संघमित्रा पाटील यांच्यात आता सरळ लढत होणार आहे. याच प्रवर्गातील वर्षा इंगोले (कारंजा) व प्रतिभा सोनोने (कारंजा) यांनी उमेदवार अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता भाजपा व राकाँत थेट लढत होणार असल्याने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गातून सविता इंगोले (वाशिम) यांनी अर्ज मागे घेतल्याने हिना कौसर मो. मुबश्शीर (वाशिम) यांची अविरोध निवड झाली तर सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून शे. अनिसाबी युनूस (कारंजा), रेखा शर्मा (वाशिम), सुमन परळीकर (मंगरूळपीर) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ज्योती लवटे (मंगरूळपीर) यांची अविरोध निवड झाली. 

भाजपा व भारिप-बमसंचे उमेदवार अविरोधवाशिम, कारंजा व मंगरूळपीर नगर परिषदेत भाजपा व भारीप-बमसंचे संख्याबळ बºयापैकी होती. या संख्याबळावर दोन्ही पक्षाचे प्रत्येकी एक उमेदवार अविरोध झाले आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून भाजपाच्या ज्योती विश्वास लवटे (मंगरूळपीर) तर नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गातून भारिप-बमसंच्या हिना कौसर मो. मुबश्शीर (वाशिम) यांची अविरोध निवड झाल्याने राजकीय समिकरण बदल असल्याचे संकेत मिळत आहे. मंगरूळपीर व वाशिम नगर परिषदेत भारतीय जनता पार्टी व भारिप-बमसंची युती आहे. युतीचा धर्म पाळत जिल्हा नियोजन विकास समितीच्या निवडणुकीतदेखील भाजपा व भारिपने आपले उमेदवार अविरोध निवडूण आणण्यात यश मिळविले आहे.