शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दोन उमेदवार अविरोध; एका जागेसाठी निवडणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:09 IST

जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) रिक्त असलेल्या तीन जागांपैकी दोन जागा अविरोध झाल्या असून, आता १४ सप्टेंबर रोजी एका जागेसाठी निवडणूक होत आहे.

ठळक मुद्देजिल्हा नियोजन समिती१0५ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) रिक्त असलेल्या तीन जागांपैकी दोन जागा अविरोध झाल्या असून, आता १४ सप्टेंबर रोजी एका जागेसाठी निवडणूक होत आहे.लहान नागरी क्षेत्रातील रिक्त जागांसाठी नगर परिषद या मतदारसंघातून ही निवडणूक होत असून, एकंदरीत १0५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी २८ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होती. त्यानुसार, शेवटच्या दिवशी १0 उमेदवारी अर्ज दाखल झाले. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छाननी होऊन त्याच दिवशी दहाही उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. ५ सप्टेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. अनु. जाती स्त्री प्रवर्गाचा अपवाद वगळता उर्वरित दोन्ही प्रवर्गातील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने दोन उमेदवारांची अविरोध निवड झाली. अनु. जाती स्त्री प्रवर्गातून भाजपाच्या करुणा कल्ले (वाशिम) व रा.काँ.च्या संघमित्रा पाटील यांच्यात आता सरळ लढत होणार आहे. याच प्रवर्गातील वर्षा इंगोले (कारंजा) व प्रतिभा सोनोने (कारंजा) यांनी उमेदवार अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता भाजपा व रा.काँ.मध्ये थेट लढत होणार असल्याने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गातून सविता इंगोले (वाशिम) यांनी अर्ज मागे घेतल्याने हिना कौसर मो. मुबश्शीर (वाशिम) यांची अविरोध निवड झाली, तर सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून शे. अनिसाबी युनूस (कारंजा), रेखा शर्मा (वाशिम), सुमन परळीकर (मंगरूळपीर) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ज्योती लवटे (मंगरूळपीर) यांची अविरोध निवड झाली. 

भाजपा व भारिप-बमसंचे उमेदवार अविरोधवाशिम, कारंजा व मंगरूळपीर नगर परिषदेत भाजपा व भारिप-बमसंचे संख्याबळ बर्‍यापैकी होती. या संख्याबळावर दोन्ही पक्षाचे प्रत्येकी एक उमेदवार अविरोध झाले आहेत. सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून भाजपाच्या ज्योती विश्‍वास लवटे (मंगरूळपीर) तर नागरिकांचा मागास स्त्री प्रवर्गातून भारिप-बमसंच्या हिना कौसर मो. मुबश्शीर (वाशिम) यांची अविरोध निवड झाल्याने राजकीय समीकरण बदल असल्याचे संकेत मिळत आहे. मंगरुळपीर व वाशिम नगर परिषदेत भारतीय जनता पार्टी व भारिप-बमसंची युती आहे. युतीचा धर्म पाळत जिल्हा नियोजन विकास समितीच्या निवडणुकीतदेखील भाजपा व भारिपने आपले उमेदवार अविरोध निवडून आणण्यात यश मिळविले आहे.-