शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

अपेक्षीत दराअभावी हळद उत्पादक शेतकरी हताश

By admin | Updated: May 26, 2017 20:18 IST

लागवडीचा खर्चही निघेना: विक्रीचा विचारच स्थगित

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: चांगले उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने पारंपरिक पिक पद्धतीला फाटा देऊन हळदीची लागवड करणारे शेतकरी अपेक्षीत दराअभावी हताश झाले आहेत. हळदीच्या लागवडीपासून काढणीपर्यंत केलेला खर्चही निघेनासा झाल्यामुळे मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैनमधील २५ शेतकऱ्यांनी हळद विकण्याचा विचारच स्थगित केला आहे. शिरपूर जैन येथील ५० हून अधिक शेतकऱ्यांनी मिळून यंदा तब्बल १ हजार २०० एकर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली होती. चांगले उत्पन्न मिळवून आर्थिक विकास साधला जावा, या उद्देशाने येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिक पद्धतीला फाटा दिला होता. हळदीच्या पिकासाठी शेतकऱ्यांना लागवडीपासून ते काढणीपर्यंत जवळपास ७५ हजार रुपये एकरी खर्च आला. चांगले उत्पादन होण्यासाठी शेतकऱ्यांनी परिश्रमही घेतले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना एकरी २५ क्विंटलपर्यंतचे उत्पादन झाल, तर इतर शेतकऱ्यांना सरासरी १८ ते २० क्विंटलचे उत्पादन झाले; परंतु आता या पिकाला सरासरी चार हजार ८०० रुपये प्रति क्विंटलचे दर मिळत असल्याने लागवडीचा खर्चही निघणे अशक्य झाले आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकरी हताश झाले असून, २५ शेतकऱ्यांनी हळदीची विक्री करण्याचा विचारच स्थगित केला आहे.