शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

तूर, भाजीपाल्यावर विपरीत परिणाम!

By admin | Updated: October 16, 2016 02:30 IST

वातावरणातील बदलामुळे ऐन दिवाळीच्या काळात भाजीपाला महागण्याचे संकेत

सुनील काकडेवाशिम, दि. १५-पावसातील अनियमिततेमुळे यंदा जिल्हय़ात सर्वदूर भल्या पहाटेपासून कडक उन्ह पडेपर्यंंत धुके पसरत आहे. वातावरणातील या बदलाचा विपरीत परिणाम तुरीसह भाजीपाला पिकावर जाणवत असून विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐन दिवाळीच्या काळात उद्भवलेल्या या बिकट समस्येमुळे भाजीपाल्याचे दर वधारतील, असे दाट संकेत मिळत आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी ४ लाख ९ हजार ६३ हेक्टर पेरणीलायक क्षेत्र असून ४ लाख २ हजार ४६६ हेक्टर क्षेत्रावर यंदा प्रत्यक्षात विविध पिकांची पेरणी करण्यात आली. त्यात ६ हजार ३५0 हेक्टर क्षेत्रावर तूर या पिकाची लागवड आहे. सध्या फुलधारणेच्या अवस्थेत असलेल्या तुरीपासून यंदा विक्रमी उत्पादन होईल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना लागून आहे; मात्र गेल्या ४ ते ५ दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन पहाटे साधारणत: ४ वाजेपासून सकाळी ८ वाजेपर्यंंत धुके पसरत असल्यामुळे तूर पिकावर विविध प्रकारच्या अळ्या व किडींचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तविली जात आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. तुरीसोबतच जिल्हय़ात १५ ऑक्टोबरअखेर १,९४१ हेक्टरवर भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. यात वाशिम तालुक्यात २0८ हेक्टर, रिसोड २९३, मालेगाव ४३८, मंगरूळपीर ३५0, मानोरा २९६ आणि कारंजा तालुक्यात २२६ हेक्टरचा समावेश आहे. दरम्यान, दैनंदिन पडणार्‍या धुक्यामुळे दोडका, काकडी, कारली, वांगी, टोमॅटो, सिमला मिर्ची, फुलकोबी यासह इतरही भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होऊन किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धुक्याचे प्रमाण असेच कायम राहिल्यास भाजीपाला पिकांचे उत्पादन घटणार असून बाजारपेठेत विक्रीला उपलब्ध होणार्‍या मालाचे दर वाढतील, असे संकेत भाजीपाला उत्पादकांकडून दिले जात आहेत. नुकसान टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी!यासंदर्भात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ भरत गीते यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी वातावरणातील बदलामुळे तूर आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होत असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. तूर, भाजीपाला आणि फळ उत्पादक शेतकर्‍यांनी धुक्यांमुळे संभावित धोका लक्षात घेऊन नुकसान टाळण्यासाठी धुके हटल्यानंतर ह्यस्प्रिंकलरह्णने झाडांवर पाण्याचा फवारा मारून झाडे धुऊन घ्यावी अथवा बुरशीनाशक, कीटकनाशक औषधीचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.