मंगरुळपीर (जि. वाशिम), ३- तालुक्यातील शेलूबाजार येथे गॅरेजचा माल घेऊन आलेला ट्रक चालक शेख इब्राहीम शेख यासीन बुधवारी सकाळी ट्रकमध्येच मृतावस्थेत आढळून आला. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अकोला येथील वायएस गॅरेजमधून शेलूबाजार येथे किराणा व इतर माल घेऊन आलेला एमएच ३0 एल २४१३ हा ट्रक रात्री उशिरा शेलुबाजारात पोहोचला. मालेगाव रोडवर रस्त्याच्या बाजूला ट्रक लावून चालक झोपी गेला. सकाळी ११ वाजतादरम्यान येऊन हमालांनी ट्रकमधील साहित्य काढले आणि नंतर चालकाला झोपेतून जागे करण्यासाठी गेले असता, तो मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना व गॅरेजच्या संबंधितांना देण्यात आली. बुधवारी दुपारी २ वाजताचे दरम्यान त्यांचा मृतदेह मंगरूळपीर येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. निसार बेग यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
ट्रक चालक आढळला मृतावस्थेत!
By admin | Updated: August 4, 2016 01:59 IST