शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी प्रवर्गातील शेतक-यांना मिळणार कृषीविषयक साहित्यांचा लाभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:56 IST

वाशिम - आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील योजनेंतर्गत आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर कृषीविषयक साहित्याचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी १० आॅक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, २५ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी मंगळवारी दिली.

ठळक मुद्दे१०० टक्के अनुदान २५ आॅक्टोबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील योजनेंतर्गत आदिवासी प्रवर्गातील शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर कृषीविषयक साहित्याचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी १० आॅक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, २५ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी मंगळवारी दिली.आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील योजनेंतर्गत नवीन विहिर, जुनी विहिर दुरुस्ती, शेततळ्यांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण, वीज जोडणी, परसबाग, बोअरींग व तसेच सुक्ष्म सिंचन अंतर्गत तुषार संच  व ठिंबक संच इत्यादी साहित्याचा लाभ शेतकºयांना देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी हा अनुसुचित जमातीचा असणे आवश्यक आहे. लाभार्थीकडे सक्षम प्राधिकाºयाने दिलेले जातवैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक असून, शेतीचा सात/बारा, आठ अ उतारा, आधारकार्ड, आधार कार्डशी संलग्न असलेले बँक खाते आवश्यक आहे. लाभार्थी निवडताना दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, आदिम जमाती वैयक्तीक वनहक्क पट्टेधारक  लाभार्थी असा प्राधान्यक्रम राहणार आहे. तसेच महिला व दिव्यांग लाभार्थींना वैयक्तीक लाभार्थी निवडताना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. २५ आॅक्टोबरपर्यंत इच्छूक शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन सभापती विश्वनाथ सानप यांनी केले.