शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा ‘पंक्चर’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST

वाशिममार्गे अमरावती, यवतमाळ, पुणे, अकोला, नांदेड, नागपूर यासह इतरही मोठमोठ्या शहरांमध्ये सुमारे २५ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवाशांची वाहतूक केली जाते. ...

वाशिममार्गे अमरावती, यवतमाळ, पुणे, अकोला, नांदेड, नागपूर यासह इतरही मोठमोठ्या शहरांमध्ये सुमारे २५ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून प्रवाशांची वाहतूक केली जाते. २०२० या संपूर्ण वर्षात मात्र जवळपास नऊ महिने व्यवसाय पूर्णत: ठप्प झालेला होता. ५० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतुकीचा हा व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला लागली. त्याचा थेट परिणाम होऊन प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या ‘स्लीपर कोच ट्रॅव्हल्स’लाही ५ ते १० प्रवासीच मिळत असल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे डिझेलचाही खर्च वसूल होणे कठीण झाल्याची माहिती ट्रॅव्हल्स मालकांनी दिली.

..............

कोरोनाआधी रोज बाहेरगावी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या - २५

सध्याची संख्या - १०

...........

बाॅक्स :

गाडी रूळावर येत होती, पण...

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गतवर्षी जवळपास नऊ महिने प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय थांबला होता. तो हळूहळू पुन्हा रूळावर येत होता. ट्रॅव्हल्सही आता ५० टक्के क्षमतेने धावू लागल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून मात्र पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे.

..........

बॅंकेचे हप्ते थकले

३८ ते ४० लाख रुपये कर्ज घेऊन ट्रॅव्हल्स विकत घेतली. त्याचे हप्ते फेडणे सुरू आहे. अशात उद्‌भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षी व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला. गाड्या जागीच उभ्या ठेवाव्या लागल्या. यामुळे टायरवर चिरा पडण्यासह बॅटरी उतरली. यामुळे ३ लाखांचा फटका बसला. आताही प्रवाशांची संख्या १० ते १५ टक्क्यांवर आलेली आहे. यामुळे बॅंकेचे हप्ते थकले आहेत.

- पप्पू चरखा

ट्रॅव्हल्स मालक, वाशिम

.......

ट्रॅव्हल्स मालक कोरोनामुळे संपण्याच्या मार्गावर आहेत. हा व्यवसाय पुरता अडचणीत सापडला असून, डिझेलचाही खर्च वसूल होणे अशक्य झाले आहे. व्यवसायाची घडी पूर्णत: विस्कळित होऊ नये, यासाठी गाड्या सुरू ठेवाव्या लागत आहेत; मात्र हा संयमही फार काळ टिकू शकणार नाही. कोरोनाच्या संकटाने ट्रॅव्हल्स मालकांसोबतच शेकडो कामगारांनाही अडचणीत टाकले आहे.

- रवि बुंदे

ट्रॅव्हल्स मालक, वाशिम

.........

कोरोनाच्या संकटामुळे ट्रॅव्हल्सला प्रवासी मिळेनासे झाले आहेत. यामुळे परजिल्ह्यात धावणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्स बंद ठेवाव्या लागत आहेत. ज्या सुरू आहेत, त्यांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने व्यवसाय परवडेनासा झाला आहे. शासनाचेही काही बाबींमध्ये धोरण चुकत आहे. एकूणच या सर्व प्रतिकूल बाबींमुळे ट्रॅव्हल्स मालक अडचणीत सापडले आहेत.

- सत्यनारायण शर्मा

अध्यक्ष, बस वाहतूक संघटना