शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ११ वर्षापासून जपली जातेय ‘कॅण्डल मार्च’ची परंपरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:23 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढून अभिवादन करण्याची परंपरा गत ११ वर्षांपासून वाशिम जिल्ह्यात जपली जात आहे. यावर्षीदेखील ६ डिसेंबरला जिल्हाभरात पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढला जाणार आहे. 

ठळक मुद्देमहापरिनिर्वाणदिनी विविध कार्यक्रम मोफत शिकवणीचा मानस

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढून अभिवादन करण्याची परंपरा गत ११ वर्षांपासून वाशिम जिल्ह्यात जपली जात आहे. यावर्षीदेखील ६ डिसेंबरला जिल्हाभरात पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढला जाणार आहे. महापरिनिर्वाण दिनी वाशिम येथे साधारणत: २००६ मध्ये ‘कॅण्डल मार्च’ व मोफत शिकवणी वर्गाचा संकल्प आंबेडकरी अनुयायांनी केला होता. ६ डिसेंबरला पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास शहराच्या कानाकोपºयातून समाजबांधव व आंबेडकरी अनुयायी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येतात. प्रत्येकजण हातात ‘कॅण्डल’ घेऊन चौकात आल्यानंतर महामानवाच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने गोलाकार स्थितीत ‘कॅण्डल’ लावली जाते. त्यानंतर सामुहिक बुद्धवंदना घेऊन पंचशील, त्रिशरण ग्रहण केले जाते. २००६ पासून सुरू झालेली ‘कॅण्डल मार्च’ची परंपरा अविरत जोपासून यावर्षीही ६ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास ‘कॅण्डल मार्च’ काढून अभिवादन केले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती वाशिमतर्फे ६ डिसेंबरला स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी ९ वाजता अभिवादन तसेच सायंकाळी ६ वाजता ‘कॅन्डल मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील मुलांना स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शन व्हावे या दृष्टिकोनातून मोफत शिकवणी वर्ग घेण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला. तसेच मालेगाव येथेदेखील ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता महामानवास अभिवादन म्हणून ‘कॅन्डल मार्च’चे आयोजन करण्यात आले आहे.