शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांनी फिरविली टरबूज खरेदीकडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:39 IST

धनज बु. : कोरोनामुळे यंदाही शेतकरी अडचणीत असून, कडक निर्बंध लागू असल्याने बाजारपेठ बंद आहे. परिणामी, टरबूज खरेदी करण्याकडे ...

धनज बु. : कोरोनामुळे यंदाही शेतकरी अडचणीत असून, कडक निर्बंध लागू असल्याने बाजारपेठ बंद आहे. परिणामी, टरबूज खरेदी करण्याकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्याने याचा फटका धनज बु. परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे.

उन्हाळ्यात थंड व शरीरास पोषक असणार फळ म्हणून टरबुजाची ओळख आहे. धनज ब. परिसरात शेतकऱ्यांकडून या पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सुरुवातीला या वर्षी टरबुजाला चांगला भाव मिळाला. जिल्ह्यातील टरबुजाला कोलकाता, दिल्ली बाजरापेठेत मागणी वाढल्याने बारा रुपये प्रतिकिलो एवढा उचांकी दर मिळाला, परंतु १५ एप्रिलनंतर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे टरबुजाचे दर बारा रुपये प्रतिकिलोवरून चार रुपये प्रतिकिलो एवढी घसरले. त्यामुळे मोठ्या आशेने टरबूज पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा होऊन आर्थिक नुकसान होत आहे. सद्या बाजारपेठा बंद असल्याने व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या मालाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

00

कोट

दोन एकर शेतामध्ये टरबूज पिकाची लागवड केली आहे. सुरुवातीला टरबूज पिकाला चांगले भाव होते, परंतु कडक निर्बंधामुळे दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने टरबूज पिकाला लावलेला खर्चही निघणे कठीण आहे.

- बाळू हेरोडे, शेतकरी