शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात भिषण पाणी टंचाई

By admin | Updated: May 16, 2017 19:21 IST

मानोरा : मानोरा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या गावामध्ये भिषण पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांंना करावा लागत आहे.

ऑनलाइन लोकमतमानोरा : मानोरा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शेंदुरजना अढाव, पांचयत समिती गणातील रणजीत नगर, पाळोदी, ढेोणी,  शेंदुरजना अढाव, उज्वलनगर, आदि गावामध्ये भिषण पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांंना करावा लागत आहे. शेंदुरजना पाणी टंचाई सदृश्य स्थिती असतांना याकडे शासनव प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.सविस्तर असे की, शेंदुरजना अढाव पं.स.गणातील ही पाच ते सहा गावे डोंगराळ भागात वसलेली आहेत. त्यामुळे भुजल पातळी अतिशय खोलवर गेलेली आहे. या परिसरात बोअरवेलसारखी यंत्रणा कुचकामी ठरत आहे.  गेल्या १४ ते १५ वर्षापुर्वी  उज्वलनगर भागातील टेकडी शिवारात तलावाचे कामाला सुरुवात झाली,मात्र  अद्यापही त्या तलावाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे फेबु्रवारीपासूनच या डोंगराळ भागामध्ये तीव्र पाणी टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. एका महिन्यापूर्वी उज्वलनगर येथील नागरिकाना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. तेव्हा तहसीलदार शेख गावामध्ये पाणी टंचाई पाहणीला गेले असता त्यांना ग्रामस्थांनी घेराव घालुन पाणी समस्या निकाली काढण्याबाबत मागणी केली होती. तेव्हा प्रशासनाच्यावतीने टँकरची व्यवस्था करुन देण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे समजते. या गावात प्रत्येक वर्षी भिषण पाणी टंचाई भासते . तरी सुध्दा शासन व प्रशासन कायमस्वरुपी पाणी टंचाई समस्या निवारण करण्याकरिता दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर पिण्याच्या पाणयासाठी रानोमाळ वणवण भटकंती करण्याची वेळ आलेली आहे.गेल्या १५ ते २० वर्षापासून उन्हाळ्यात पाणी टंचाई भासते. प्रशासन अखेरच्या महिन्यात तात्पुरती पाण्याची उपाय योजना करुन देण्यात धन्यता मानते. फेबु्रवारीपासून दरवर्षी भिषण पाणी टंचाई उदभवते. पाणी टंचाई समस्येमुळे ग्रामस्थांचा वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो. त्यामुळे मजुरी बुडते. परिणामी, पाणी टंचाईने अनेक ग्रामस्थ कुटूंबासह पुणे, मुंबई, सुरत आदि ठिकाणी कामाला जावुन उदरनिर्वाह करतात.त्यामुळे शासनाने कायम स्वरुपी पाणी टंचाई दुर करण्याकरिता उपाय योजना करावी.- रेखाताई नथ्थु पडवाल, पं.स.सदस्या