शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामाचा आढावा!

By admin | Updated: July 20, 2016 02:04 IST

२0 ग्रामपंचायतींची कामगिरी शून्य; सुधारणा करण्याचे निर्देश

वाशिम: जिल्ह्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी आता ग्रामसेवकांच्या तालुकानिहाय आढावा सभा लावल्या आहेत. या सभेच्या माध्यमातून कामचुकार आणि अकार्यक्षम ग्रामसेवकांना लक्ष्य केले आहे. मंगळवारी मंगरुळपीर पंचायत समिती येथून आढावा सभेला सुरूवात झाली असून, बुधवारी रिसोड येथे सभा झाली. मंगरुळपीर येथे मग्रारोहयोचे उप जिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, गटविकास अधिकारी राठोड, गणेश देशमुख, जि. प. सदस्य शिवदास राऊत, विश्‍वास गोदमले आदिंची उपस्थिती होती. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यात सन २0१६-१७ या आर्थिक वर्षाच्या कृती आराखड्यात ३६ ग्रामपंचायतींचा समावेश केला आहे. ऑनलाइन अहवालानुसार ३६ पैकी २0 ग्रामपंचायतीमध्ये या वर्षात आजपर्यंत एकही शौचालय बांधले नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. यावर गणेश पाटील यांनी अशा झीरोवाल्या ग्रामसेवकांना उभे करून गावातील लाभार्थीनिहाय शौचालय बांधकामाचे नियोजन सादर करण्याच्या सूचना दिल्या. मागील साडेतीन महिन्यांत एकही शौचालय न बांधणार्‍या ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी चांगलेच धारेवर धरले. काम न करण्याची ग्रामसेवकांची प्रवृत्ती गावासाठी तर घातक आहेच; परंतु ती स्वच्छ भारत मिशनच्या राष्ट्रीय कामात बाधा निर्माण करणारी असल्याने यात होत असलेली दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. व्हॉट्स अँप नंबरचे बोर्ड पंचायत समितीत लागले नसल्याची जाणीव करून देत आता प्रत्येक गावातही असा बोर्ड लावण्याचे निर्देश गटविकास अधिकारी राठोड यांना दिले. लोकांनी शौचालय बांधल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ देण्याचे निर्देशही पाटील यांनी दिले. शौचालय बांधल्यानंतर त्याचे अनुदान वितरित करणे व नंतर त्याची ऑनलाइन माहिती भरणे आवश्यक असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले.