शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषदेची आज सर्वसाधारण सभा

By admin | Updated: March 20, 2017 03:03 IST

१७ मार्च रोजी अपूर्ण राहिलेली जिल्हा परिषदेची सभा २0 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात येणार आहे.

वाशिम, दि. १९- १७ मार्च रोजी अपूर्ण राहिलेली जिल्हा परिषदेची सभा २0 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात शुक्रवार, १७ मार्च रोजी अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या सभेत अर्थ समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सलग तिसर्‍यांदा जिल्हा परिषदेचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, अन्य सदस्यांनी काही मुद्दे उपस्थित करून अर्थसंकल्पाच्या मंजुरीला विरोध दर्शविला होता. वादळी चर्चेत सायंकाळपर्यंतही कामकाज संपत नसल्याचे पाहून, पीठासीन अधिकारी हर्षदा दिलीप देशमुख यांनी अपूर्ण सभा २0 मार्च रोजी पुन्हा घेण्यात येईल, असा निर्णय जाहीर केला. त्यानुसार २0 मार्चला सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पीय सभा आणि दुपारी १ वाजतानंतर सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे.१७ मार्च रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सन २0१७-१८ या वर्षात विविध मार्गाने ४ कोटी ४0 लाख ४१ हजार ९३५ रुपयांचा महसूल येणार असून, ४ कोटी ३४ लाख ८२ हजार रुपये विविध विभागाच्या योजनांवर खर्च होणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला. हा अर्थसंकल्प शिलकीचा असून, उपलब्ध उत्पन्नानुसार विविध विभागांवर तरतूद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, सोमवारच्या अर्थसंकल्पीय व सर्वसाधारण सभेत कोणत्या विषयावर वादळी चर्चा होणार, विरोधकांची भूमिका कोण बजावणार, विरोधकांचा आक्रमकपणा जागृत होईल का, आदी प्रश्नांकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. सत्ताधारीच बनले विरोधक!जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं व अपक्ष मिळून आघाडीची सत्ता आहे. विरोधी बाकावर शिवसेना-भाजपा असतानाही सभेत विरोधक हे विरोधकाची भूमिका बजावत नसल्याचे दिसून येते. सत्ताधारी सदस्यच विरोधकाची भूमिका बजावून सभागृह दणाणून सोडतात.