वाशिम : येथील नगर परिषद स्थायी समितीची निवडणूक उदया २ डिसेंबर रोजी होत असून या निवडणुकीसंदर्भात अतिशय गोपनियता पाळल्या जात आहे.वाशिम नगरपरिषदेच्या स्थायी समिती निवडणूक अनुषंगाने २ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता व दुपारी ३ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये स्थायी समितीमधील सदस्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केल्या जाणार आहे. जिल्हा विकास आघाडीचे सुप्रिमो आमदार राजेंद्र पाटणी यांना सर्वाधिक अधिकार देण्यात आल्याने कोणची निवड होते याकडे नगरपरिषद वतरुळात उत्सुकता लागली आहे.
आज वाशिम न.प. स्थायी समितीची निवडणूक
By admin | Updated: January 2, 2015 01:02 IST