शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन अर्जांंचा आज शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:03 IST

वाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी व २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान, १८ सप्टेंबरपर्यंंत एकूण २.१६ लाख शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली तर यापैकी केवळ १.२५ लाख शेतकर्‍यांनीच अर्ज भरले. उर्वरित एक लाख शेतकर्‍यांना एका दिवसात ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत.  

ठळक मुद्देकर्जमाफी योजना एक लाख शेतकर्‍यांचे अर्ज भरणे बाकी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी व २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान, १८ सप्टेंबरपर्यंंत एकूण २.१६ लाख शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी केली तर यापैकी केवळ १.२५ लाख शेतकर्‍यांनीच अर्ज भरले. उर्वरित एक लाख शेतकर्‍यांना एका दिवसात ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत.  २२ सप्टेंबरपर्यंंंत ऑनलाइन अर्ज न भरल्यास कर्जमाफीच्या लाभापासून संबंधित शेतकर्‍यांना वंचित राहावे लागणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेले, कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा सामान्य रुगणालयात ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तसेच वाशिम कारागृहातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या कैद्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यासाठी कारागृहातसुद्धा ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांची नाव नोंदणी करून घेण्यात येते. त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरले जातात. मात्र ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी नाव नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण न झालेले अनेक शेतकरी आहेत. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, १८ सप्टेंबरपर्यंंत २.१६ लाख शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंदणी झाली होती. यापैकी एक लाख २५ हजार ८५ शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. शेवटच्या दिवशी अर्थात २२ सप्टेंबरपर्यंंंत जवळपास एक लाख शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. त्यातच वीज भारनियमन, कनेक्टिव्हिटी नसणे, तांत्रिक अडचणी, बोटांचे ठसे न घेणे आदी अडचणी निर्माण झाल्यास काही शेतकरी ऑनलाइन अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित शेतकर्‍याला कर्जमाफी अथवा २५ हजार रुपयांपर्यंंंतच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळू शकणार नाही.बँकेमध्ये ऑफलाइन अर्ज सादर केलेल्या शेतकर्‍यांनीसुद्धा ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. पात्र शेतकर्‍याने घेतलेले पीक कर्ज कोणत्याही बँकेचे असले तरी कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी भरण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जांंंमधील त्रुटींची दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या त्रुटींची दुरुस्तीही २२ सप्टेंबर २0१७ पर्यंंंतच करणे आवश्यक आहे. संबंधित शेतकर्‍यांनी २२ सप्टेंबरपर्यंंंत ऑनलाइन अर्ज भरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.

मुदतवाढ देण्याची मागणीअनेक शेतकर्‍यांच्या बोटांचे ठसे येत नसल्याने त्यांना ऑनलाइन अर्ज भरता आले नाहीत. आधार कार्डशी बोटाचे ठसे संबंधित असल्याने तहसील कार्यालयांतून आधार कार्ड व बोटाचे ठसे ‘अपडेट’ करण्याचा सल्ला शेतकर्‍यांना प्रशासनातर्फे देण्यात आला होता. तथापि, अद्यापही अनेक शेतकर्‍यांचे आधार कार्ड व बोटाचे ठसे ‘अपडेट’ झाले नसल्याने अर्ज करण्याला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.