शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के मोफत प्रवेश अर्जासाठी आज शेवटचा दिवस

By admin | Updated: July 10, 2017 02:02 IST

२५ टक्के कोट्यातील जागा रिक्त असल्याने या जागेसाठी संबंधित शाळेत आॅनलाइन अर्ज केल्यानंतर, अर्ज पात्र ठरल्यास प्रवेश मिळणार आहे. ११ जुलैपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: पूर्व वैमनस्यातून दोन ट्रक चालकांनी तिसऱ्या ट्रक चालकास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ९ जुलै रोजी दुपारी १.०० वाजता च्या दरम्यान वडप टोल नाक्याजवळ घडली. या ट्रकच्या थरारात तिसरा ट्रक उलटून त्यामधील चालक जखमी झाला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार उत्तर प्रदेश सुलतानपूर जिल्ह्यातील अलिंगज येथील रहिवासी जखमी चालक जुम्मन युनूस (२२) हा क्र.एम.एच.०४ एफडी ८७९२ क्रमांकाचा ट्रक घेऊन वाशी मुंबईवरुन नागपूरकडे जात असता विरुद्ध दिशेने आरोपी ललक मिराज गौसी रा.सुलतानपूर जि.अलिगंज उत्तर प्रदेश एम.एल ०४ -७४१७ क्रमांकाचा ट्रक घेऊन विरुद्ध दिशेने येत होता. मालेगावनजीक वडप बायपासवर हे दोन ट्रक आमोरासमोर आले असता आरोपी ट्रॅक चालक मिराज गौसी यांनी पूर्ववैमनस्यातून बदला घेण्याच्या उद्देशाने ट्रॅक वडप टोलनाक्यावरुन पलटून एम.एच.०४ एफडी ८७९२ क्रमांकाच्या ट्रॅकच्या मागे लागला. तसेच मागून क्र.एम.एच.०४ जी.आर.०५६२ या क्रमांकाचा ट्रक घेऊन येत असलेला आरोपीचा मित्र एजाज मलीक रा.सिध्दार्थ नगर यू.पी. याला आरोपीने फोन करुन जुम्मन युनूस समोरुन येत आहे. मी त्याचा पाठलाग करीत आहे. तु त्याला समोरुन धडक दे मी मागून जोरदार धडक देतो. असे म्हणत जुम्मनच्या ट्रकचा पाठलाग सुरू केला. वडप टोलनाक्यापासून वडप बायपासपर्यंतच्या मार्गावर ट्रॅकचा हा थरार सुरु होता. त्यावेळी डोंगरकिन्ही येथून मालेगावकडे येणारे प्रदीप गवई यांना सदर प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला फोन करुन सदर माहिती दिली असता कर्तव्यावर हजर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गवई व शिंदे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. दरम्यान या दोन ट्रॅकमधील एका ट्रॅक चालकाने जीव वाचविण्याच्या भीतीने आपला ट्रॅक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा ट्रक उलटला. यानंतर आरोपी मिराज गौसी हा मेहकरकडे आपला ट्रक घेऊन निघून गेला. मात्र, दुसरा आरोपी एजाज मलिक यास पोलिसांनी त्यांच्या ट्रॅकसह ताब्यात घेऊन डोणगाव पोलिसांना सदर ट्रकबाबत माहिती दिलीे. डोणगाव पोलिसांनी आरोपी मिराज गौसीसह ट्रॅक ताब्यात घेऊन मालेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनास्थळी ए.पी.आय. गवई व शिंदे पो.काँ. संजय पवार व श्रीराम मिश्रा चालक भालेराव यांनी जखमी चालक जुम्मन युनूस यास ग्रामीण रुग्णयालयात उपचारासाठी नेले होते. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३२३, ५०४, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.