शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोमधील मजुरांची मजुरी थकित

By admin | Updated: January 20, 2015 00:40 IST

वाशिम जिल्ह्यातील मजुरांवर उपासमार: कारवाईची मागणी.

वाशिम : दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतावर कामे नसताना पोटाची खळगी भरण्यासाठी शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये काम करुन दोन महिने झाले तरी मजुरांना मजुरी मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमार आली आहे. एकीकडे दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये मजुराची उपासमार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने प्रत्येक गावात पाच- पाच कामे सुरु करण्याचे आदेश दिलेत; परंतु दुसरीकडे रोहयोची कामे करुन महिना दोन महिना काम करुन कामाचे दाम मजुरांना मिळाले नाही. १५ दिवसात मजुरांना कामाचा मोबदला द्या, अन्यथा दोषीवर कार्यवाही करा, असा रोहयोचा नियम आहे. वाशिम पं.स. मध्ये १00 च्या वर मस्टर/हजेरीपत्रक पेंडिंग आहेत. ए.पी.ओ. खिल्लारे म्हणतात. बिल पास केले नाही आणि गट विकास अधिकार्‍यांनी सहय़ा केल्या नाहीत तर मी पैसे कसे पाठवू. गटविकास अधिकारी आर.के. तांबे म्हणतात, मजुरांच्या पैशाला विलंब लावू नका; मात्र कोणीही पुढाकार घेत नसल्याने यामध्ये मात्र मजुरांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी यांनी वाशिम पं.स.च्या हलगर्जीपणाकडे गांभीर्याने लक्ष घालून मजुरी तत्काळ अदा करण्याचे आदेश द्यावेत व दुष्काळग्रस्त मजुराला उपासमारीची वेळ आणणार्‍या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी मजुरांकडून होत आहे. मजुरांचे मजुरीचे पेंडिंग मस्टर लवकर पास करुन देण्याचे आदेश आपण सले आ. पाटील यांना दिले. तसेच कुठल्याही मजुरांच्या मस्टरला विलंब लावू नये, असे आदेशही एपीओ खिलारे यांना दिले आहेत. लवकरच मजुरांना त्यांची मजुरी मिळेल, असे गटविकास अधिकारी आर.के. तांबे यांनी सांगीतले.