शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी हमीदरापेक्षा कमी दरानेच!

By admin | Updated: July 11, 2017 19:30 IST

जिल्ह्यातील वास्तव: नाफेड बंद झाल्यानंतर शेतकरी हताश

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने यंदा १ जूनपासून नाफेडची खरेदी बंद के ल्यानंतर तूर उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. शेकडो शेतकऱ्यांच्या घरात अद्यापही हजारो क्विंटल तूर पडून आहे. हे शेतकरी खरीपात वेळोवेळी लागणाऱ्या शेतीखर्चासाठी तूर बाजारात विकत आहेत; परंतु व्यापाऱ्यांकडून त्यांची तूर हमीदरापेक्षा खूप कमी दराने खरेदी करण्यात येत आहे.मागील वर्षी जिल्ह्यात ६३ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा झाला होता. हवामानाची चांगली साथ मिळाल्याने उत्पादनही भरघोस झाले होते; परंतु या वाणाला शासनाने अत्यंत तोकडा असा प्रति क्विंटल ५ हजार ५० रुपये हमीदर जाहीर केला. त्यातच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची तूर त्यापेक्षा खूप कमी दरात खरेदी केली जात असल्याने शासनाच्यावतीने राज्यभरात तूर खरेदी केंद्रं सुरू करून हमीदराने शेतकऱ्यांची तूर खरेदी के ली; परंतु यात अनेक अडचणी आल्या. प्रत्यक्षात शासनाने नियोजन केलेल्या आकड्यापेक्षा खूप अधिक प्रमाणात तूर खरेदी केली तरीही, शेतकऱ्यांकडे लाखो क्विंटल तूर पडूनच होती. अखेर शासनान जूनपासून शासकीय तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. तथापि, त्यापूर्वी टोकण घेतलेल्या शेतकऱ्यांची तूर १० जूनपर्यंत मोजण्यात आली. यातही अनेक शेतकरी मोजणीपासून वंचित राहिले. दरम्यान, शासकीय खरेदी बंद केल्यानंतर व्यापाऱ्यांना हमीदराने तूर खरेदी करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले; परंतु आता महिना उलटत आला तरी, याची अंमलबजावणी वाशिम जिल्ह्यात तरी होत नसल्याचे दिसत आहे. मागील आठवडाभरात जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमधील तुरीचे दर जाणून घेतले असता एकाही बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी किमान ३ हजार ४०० ते कमाल ३ हजार ८५५ पेक्षा अधिक दराने तूर खरेदी केली नसल्याचे आढळून आले. त्यावरून तुरीच्य हमीदराला व्यापाऱ्यांकडून खो देण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.