शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पुलाअभावी शेतक-यांवर शेतमाल शेतात ठेवण्याची वेळ

By admin | Updated: October 8, 2016 02:18 IST

काम त्वरित पूर्ण करण्याची शेतक-यांची मागणी.

देपूळ(जि. वाशिम ) : प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यंत्रणाद्वारे करण्यात येत असलेल्या पूस नदीवरील पर्यायी पुलाचे काम रखडल्याने शेतकर्‍यांना चार ते पाच फूट खोल पाण्यातून जुन्या पुलावरून ये-जा करावी लागत आहे. एक हजार ५00 एकर शेतातील सोयाबीनचे पीक शेतात ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या पुलाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी भारिप-बमसंचे तालुकाध्यक्ष बालाजी पांडुरंग यांनी ७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनातून केली आहे. लघु पाटबंधारे विभाग क्रमांक तीन वाशिमच्या अधिपत्याखाली झालेल्या वारा जहागीर बृहत लघु पाटबंधारे योजनेच्या सिंचन प्रकल्पाच्या बुडित क्षेत्राखाली देपूळ ते बोरी रस्त्यावरील पूस नदीवरील पूल पाच फूट पाण्याखाली गेल्याने बोरी ते देपूळ गावचा संपर्क तुटला असून, या रस्त्यावरून शेती करणार्‍या २५0 शेतकर्‍यांच्या १ हजार ५00 शेतातील सोयाबीन पीक शेतात ठेवण्याची वेळ आली. या पुलाचे काम त्वरित व्हावे, याकरिता लघू पाटबंधारे विभाग क्रमांक तीन वाशिमने १ कोटी ३३ लाखाचा निधी पंतप्रधान ग्राम सडक योजना वाशिमला दोन वर्षांपूर्वी वळता केला; परंतु संबंधित यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍यांना नाहक हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या यंत्रणेने संबंधित पुलाचे अर्धवट काम करून आता काम थांबविले आहे. दरम्यान, या पुलाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करणे आवश्यक असल्याने योग्य त्या उपायेयाजना त्वरित करून काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशा सूचना कार्यकारी अभियंता एस.डी.जाधव यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्याला अनेकदा दिल्या; मात्र संबंधित यंत्रणा लक्ष देण्यास तयार नसल्याने शेतकर्‍यांचे नाहक हाल होत आहेत. याकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.