शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

विजांच्या कडकडाटासह वादळी वा-याचे थैमान

By admin | Updated: March 1, 2016 01:16 IST

वाशिम जिल्ह्यातील आगरवाडी येथे वीज पडून साहित्याचे नुकसान.

वाशिम: जिल्ह्यात वादळी वारा व विजांच्या कडकडाटामुळे फळबागांसह कांदा पिकाचे नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील आगरखेड येथे वीज पडून गोठय़ाचे नुकसान झाले. जांभरूण जहागीर येथे एका खासगी कंपनीचे लाखो रुपयांचे टीनाचे शेड कोसळले.जांभरूण जहागीर येथील मनीबाई अँग्रो इंडस्ट्रीजचे टीनशेड २६ फेब्रुवारी रोजी आलेल्या वादळामुळे कोसळले. त्यामुळे गोविंद अग्रवाल यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अंचळ येथे चक्रीवादळ व गारपीट; लाखोंचे नुकसानअंचळ  येथे २८ फेब्रुवारीच्या रात्री चक्रीवादळासह गारपीट व पाऊस झाल्याने गावातील घरांचे व शेतातील पिकांचे नुकसान झाले. रात्री १२ वाजता अचानक चक्रीवादळाला सुरुवात होऊन गारपीट, पाऊस आणि वारा यामुळे गावातील काही घरांवरील पत्रे उडण्यास सुरुवात झाली. हवेच्या वेगामुळे गावातील विजेच्या तारा सर्व गावामध्ये रस्त्यावर पडल्या. मारोती संस्थान अंचळच्या मंदिरावरील पितळी कळस खाली कोसळला. जि.प.शाळेच्या दोन खोल्यांवरील टिनपत्रे उडून भिंतींना तडे गेले. रात्रीची वेळ असल्याने सर्व गावकरी झोपेत असल्यामुळे जीवित हानी झाली नाही.शेतामधील कापणीस आलेल्या गहू, हरभरा, काढणीला आलेला सत्रा, टोळकांदा, पपई, इत्यादी पिकांचे शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शेतातील मोठमोठी आंब्याची व इतर झाडे मुळासहित उन्मळून पडली आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार अमित झनक, जि.प.सदस्य सुधीर गोळे, पं.स.उपसभापती महादेव ठाकरे, पं.स. सदस्य डॉ.गजानन बाजड, तलाठी एच.आर.पवार, ग्रामसेवक पी.के.भुतेकर, लाइनमन काळे, कृषी सहायक मार्गे, इत्यादींनी भेट देऊन नुकसानीची पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिली. आ.अमित झनक यांनी नुकसानग्रस्तांची व्यक्तीश: भेट घेऊन माहिती घेतली व गावातील, घरांची, शेतातील पिकांचे नुकसान पाहून संबंधितांनी पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

वीज पडून दीड लाखाचे नुकसानरविवारच्या रात्रीदरम्यान रिसोड तालुक्यातील आगरवाडी शेतशिवारातील कोठय़ावर वीज पडून जवळपास दीड लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जीवितहानी टळली. गावानजीक उद्धव वायभासे यांच्या गट नं. २३८ मधील शेतातील पक्क्या विटांच्या गोठय़ावर वीज पडून गोठय़ामधील २ सेट स्प्रिंकलर, एरंडीचे बियाणे, टिनपत्रे, गुरांचा चारा, शेती उपयोगी अवजारे, पीव्हीसी पाइप, सायकल, असा एकूण १ लाख ४३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद आहे.