शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

वाशिमचे तरुण इतिहास घडविण्याच्या उंबरठय़ावर

By admin | Updated: June 18, 2017 01:52 IST

धाडसी उपक्रम; सायकलने ४.५ हजार किमी प्रवास!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील वाशिम सायकलस्वार ग्रुपचे गौरांग नाईक व अभिषेक व्यवहारे हे २२ वर्षीय तरुण इतिहास घडविण्याच्या उंबरठय़ावर पोहोचले आहेत. सायकलने भारतभ्रमण करीत ४ हजार ६00 किलोमीटर अंतर पार करण्याचे ध्येय उराशी बाळगून या मोहिमेला त्यांनी १ जून २0१७ रोजी सुरुवात केली असून, सद्यस्थितीत त्यांनी १ हजार ८00 किलोमीटर अं तराचा टप्पा पारही केला आहे.वाशिम सायकलस्वार ग्रुपचे गौरांग नाईक व अभिषेक व्यवहारे यांनी अवघ्या ३0 दिवसांत ४६00 किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे. या मोहिमेंतर्गत हे दोघे १ जून रोजी कन्याकुमारीहून लेहकडे जाण्यासाठी सायकलवरून निघाले. हे दोघेही यंदा नुकत्याच सुरु झालेल्या पावसाचा सामना करीत १८00 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून १४ जून रोजी नागपुरात दाखल झाले आहेत. ह्यसायकल टू वर्कह्ण हा संदेश घेऊन ते सायकलवर भारतभ्रमण करीत आहेत. त्यांनी आपल्या मोहिमेला ह्यके टू केह्ण (कन्याकुमारी ते खारदुंग पास) असे नाव दिले आहे. ते ज्या-ज्या शहरातून गेलेत तेथील सायकलप्रेमी मंडळींनी त्यांचे स्वागत करून त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. काही मंडळीनी त्यांना आर्थिक मदतसुद्धा केली. अकोल्याचे डॉ.राजेंद्र सोनोने यांनी त्यांच्या साहसिक सायकल सफरीची कहाणी फेसबुकवर वाचून त्यांना ५ हजार रुपयांची मदत केली आहे. हे दोघे आता १६ जून रोजी नागपूरहून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. दिल्लीला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. नंतर जगातील सर्वात उंच अशा मार्गावर खारदूंग पास येथे आपला ४६00 किलोमीटर अंतराचा प्रवास पूर्ण करून एक नवा इतिहास रचणार आहेत.