शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील तीन तालुके वसुलीच्या उद्दिष्टात अपयशी !

By admin | Updated: April 4, 2017 16:00 IST

शासनाने वाशिम जिल्ह्यासाठी यंदा ४३ कोटींच्या महसुल वसुलीचे उद्दिष्ट निर्धारित केले होते.

वाशिम :  शासनाने वाशिम जिल्ह्यासाठी यंदा ४३ कोटींच्या महसुल वसुलीचे उद्दिष्ट निर्धारित केले होते. हे उद्द्ष्टि गाठण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने कसोशीचे प्रयत्न केले. त्यामुळे जिल्ह्यास १०२ टक्के वसुली करणे शक्य झाले असले तरी, सहापैकी तीन तालुक्यांना त्यांचे उद्दिष्ट गाठता आले नाही. उर्वरित तालुक्यांनी निर्धारित उद्दिष्टापैक्षा खूप अधिक वसुली केल्यामुळे जिल्ह्यास आपले एकूण उद्दिष्ट गाठणे शक्य झाले आहे. जिल्हाप्रशासनाकडून सोमवारी मिळालेल्या माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे. वाशिम जिह्याला सन २०१६-१७ या वर्षाकरीता शासनाकडुन ४३ कोटी ५१ रुपये महसुल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ मार्चला अखेर जिल्ह्याने ४४ कोेटी  ५२ लाख  ५६ हजार रुपये महसुल वसुल करुन उद्दिष्टाच्या १०२ टक्के रक्कम वसुल केली. तथापि जिल्ह्यातील मालेगाव, मानोरा आणि रिसोड तालुक्यांना आपले उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. या तालुक्यांनी त्यांना दिलेल्या निर्धारित उद्दिष्टापैकी अनुक्रमे ५४.८४ टक्के, ८५.१४ टक्के, आणि ३७.६५ टक्के वसुली केली आहे. त्या उलट वाशिम तालुक्याने १४३.४१ टक्के, मंगरुळपीर १३२.४४ टक्के, ११२.४९ टक्के वसुली केली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्याला आपले उद्दिष्ट पूर्ण करता आले आहे. वाशिम जिल्ह्याने २०१६-१७ या वषार्साठी जमीन महसुलात २० कोटी ८२ लाख २८ हजार,  कोटी, करमणुक कराची १ कोटी १९ लाख, तर गौण खनिजाची  वसुली २२ कोटी ७० लाख ९ हजार असा एकूण ४४ कोटी ५२ लाख ५६ हजार रुपयांचा महसुल वसुल करुन १०२.३३ टक्के उद्दिष्ट पुर्ण केले आहे. महसुल वसुलीसाठी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्यापर्यंत सुक्ष्म नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार वर्षभर जमीन महसुल, करमणुक कर व गौण खनिजाची वसुली करण्यात आली.