जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. सोमवारी नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. ४१० नवीन रुग्ण आढळले, तर ४९१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. वाशिम, रिसोड शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दुसरीकडे मृत्यूसत्रही सुरूच असल्याचे दिसून येते. सोमवारच्या अहवालानुसार उपचारांदरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला. एकूण ४१० जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम ९१, मालेगाव तालुक्यातील २६, रिसोड तालुक्यातील १३३, मंगरूळपीर तालुक्यातील ६०, कारंजा तालुक्यातील आठ आणि मानोरा तालुक्यात ६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील २३ बाधितांची नोंद झाली आहे.
००००००००००००
४९१ जणांची कोरोनावर मात
सोमवारच्या अहवालानुसार नव्याने ४१० रुग्ण आढळून आले, तर ४९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ४४०१ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
एकूण पॉझिटिव्ह ३६१५९
ॲक्टिव्ह ४४०१
डिस्चार्ज ३१३८३
मृत्यू ३७४