वाशिम : तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना वाशिम जिल्हय़ातील मालेगाव, पिंपळगाव (डा.बं.) व विळेगाव परिसरात ४ मे रोजी घडल्या. कामरगाव : रस्त्याच्या कडेला असलेले जळलेल्या अवस्थेतील झाड दुचाकीवर पडून महिलेचा मृत्यू, तर मुलगी व पती जखमी झाल्याची घटना ४ मे रोजी धनज बु. पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या विळेगावनजीक घडली. बडनेरा येथील गजानन ढोरे (४0), संगीता गजानन ढोरे (३५) व कल्याणी गजानन ढोरे (१७) हे तिघे एम.एच.२७ ए५ - ९१0३ क्रमांकाच्या दुचाकीवर बसून बडनेराकडे जात असताना विळेगावनजीक रस्त्याच्या कडेला अर्धवट जळलेल्या अवस्थेतील झाड त्यांच्या दुचाकीवर कोसळले. यामध्ये संगीता ढोरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती गजानन व मुलगी कल्याणी हे गंभीर जखमी झाले. त्या दोघांना अमरावती येथे उपचारार्थ हलविण्यात आले. दुसर्या अपघातात मालेगाव येथील मेहकर रोडवरील सोसायटी पेट्रोल पंपासमोर ४ मे रोजी सकाळी ९ वाजता भरधाव येणार्या ट्रकने मोटारसायकलस्वाराला जबर धडक दिली. यामध्ये मोटारसायकलचालक नारायण नरसय्या एनेवार (वय ६५ वर्ष) रा. मालेगाव हे जागीच ठार झाले. तर वाशिमवरून पुसदकडे भरधाव जाणार्या इंडिकाने विरुद्ध दिशेने येणार्या मोटारसायकलला पिंपळगाव (डा.बं.) नजीक जबरदस्त धडक दिली. यामध्ये एक जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले.
वेगवेगळ्या अपघातात तीन ठार
By admin | Updated: May 5, 2015 00:27 IST